4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या. Guhagar by-election unopposed
कुटगिरी ग्रामपंचायतीमधील प्रभाग 1 मधील दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुवर्णा सुरेश खापरे (सर्वसाधारण स्त्री) व रमेश बाळू खापरे (सर्वसाधारण) हे निवडून आले. पेवे ग्रामपंचायतीमधील प्रभाग 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुरज शांताराम हरचिलकर निवडून आले. Guhagar by-election unopposed


साखरीआगर ग्रामपंचायतीमधील प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर कु. गायत्री मारुती होडेकर निवडून आल्या. भातगांव ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण स्त्री राखीव दोन जागा आणि प्रभाग क्र. 3 मधील सर्वसाधारण जागेसाठी पोटनिवडणुक झाली. यामध्ये प्रभाग 1 मधुन समिधा विजय कदम व प्राजक्ता दिपक पाष्टे बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग 3 मधील सर्वसाधारण जागेवर प्रशांत प्रदीप बेर्डे बिनविरोध निवडून आले. Guhagar by-election unopposed