गुहागर, ता. 22 : भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जिल्हा रत्नागिरीचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडले. हे शिबीर सामाजिक युवा कार्यकर्ते श्री. उमेश उदय पवार, सौ. अल्पिता उमेश पवार यांच्या सौजन्याने संपन्न झाले. Training of Samata Sainik Dal in Abaloli
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्ध महासभा धम्म संघटनेचे जिल्हा सचिव व गुहागर तालुकाध्यक्ष श्री. विद्याधर विठ्ठल कदम हे होते. कार्यक्रमाची सुरूवात ध्वजारोहन व सामुदायिक बुध्द वंदनाने करण्यात आली. यावेळी प्रशिक्षक असिस्टंट स्टाफ ऑफीसर केंद्रीय शिक्षक अशोक राजाराम कदम यांनी समता सैनिक दलाच्या सैनिकांना बेसिक परेड कवायत, अस्पृश्यांची शौर्यगाथा व समता सैनिक दलाची कार्य तसेच भारतीय संहित दंड १८६२ या कायद्याची माहिती व आपली कर्तव्य या विषयी मौलिक मार्गदर्शन केले. Training of Samata Sainik Dal in Abaloli

मेजर प्रकाश सुर्वे यांनी कवायत प्रात्याक्षिक त्यातील शिस्त, सॕल्युड कसा द्यावा, आपल्या देशाची सद्य परिस्थिती आणि जयंती महोत्सव यामध्ये आपल्या नेत्यांचे संरक्षण आणि जनतेची काळजी कशी घ्यावी तसेच आपत्कालीन स्थितीत प्रथोमोपचार कसे करावेत, कोणती काळजी घ्यावी याचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात श्री. सुरेश पवार, सौ. कविता पवार, कु. अभया कदम, श्री. उमेश पवार यांनी समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबीरात आलेले अनुभव कथन केले. त्यानंतर शपथ ग्रहण सोहळाही उत्साहात संपन्न झाला. Training of Samata Sainik Dal in Abaloli
यावेळी प्रशिक्षक असिस्टंट स्टाफ ऑफीसर केंद्रीय शिक्षक अशोक कदम, मेजर प्रकाश सुर्वे, तालुकाध्यक्ष विद्याधर कदम, गुहागर तालुका चिटणीस जितेंद्र जाधव, उमेश पवार , मिलींद पवार आदी उपस्थित होते. Training of Samata Sainik Dal in Abaloli
