• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 November 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ आंबेकरवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापुजा संपन्न

by Guhagar News
May 17, 2023
in Guhagar
97 1
0
Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath
191
SHARES
547
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विकास कामांत ग्रामस्थांची साथ व ग्रामपंचायतीचा हात; सरपंच जनार्दन आंबेकर

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सालाबादाप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने शतकोत्तर १०६ वी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा उत्साहात श्री देव भराडा मंदिर येथे पार पडली. सन १९१८ मध्ये पुर्वजांनी संघटीतपणे एकत्रित येऊन प्रथम सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा सुरू केली होती. Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

सदर पुजेचे उत्तम नियोजन करताना श्री सत्यनारायणाची महापुजा, सामुहिक आरती आणि भजन, गावातील नऊ वाड्यांमधील महिलांना प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणानुसार हळदीकुंकू, विद्यार्थींना अधिक प्रोत्साहन मिळावे, या हेतूने गुणवत्त आणि विषेश प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान, या वर्षी ज्या जेष्ठ ग्रामस्थांनी ६० वर्षे पुर्ण केली  त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन जीवन गौरव सन्मान आणि सांस्कृतिक (कलाविष्कार) कार्यक्रमाअंतर्गत वाडीतील लहान-मोठ्या मुला-मुलींचे व महिलांचे रेकॉर्ड डान्स (४०/४५), महिला शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक प्रबोधनात्मक एकांकिका अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन मुंबईकर आणि स्थानिक मंडळींनी पद्धतशीरपणे केले होते. Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

हळदीकुंकू समारंभ सोहळ्यासाठी खास निमंत्रित केलेल्या वेळणेश्वर जि. प. गटाच्या माजी सदस्या सौ नेत्राताई ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्येची देवता श्री सरस्वती देवीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू, तिळगूळ व वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नेत्राताई ठाकूर यांनी सुमारे १५० महिलाना प्रत्येकी एक स्टील डिस आणि प्रत्येक वाडीसाठी महिला मंडळ अध्यक्षांना मोठी स्टील परात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या हळदीकुंकू समारंभाचे उत्तम नियोजन आंबेकरवाडी महिला मंडळांने केले तर सुत्र संचालन पोलीस पाटील वासंती आंबेकर यांनी केले. या आयोजित कार्यक्रमात सौ. नेत्राताई ठाकूर यांना उमराठ खुर्द आंबेकरवाडी प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष श्री लक्ष्मण रूपा आंबेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

या कार्यक्रमाला उमराठ ग्रामपंचायतीचे सरपंच जनार्दन आंबेकर, सदस्य शशिकांत आंबेकर, सदस्या अर्पिता गावणंग, माजी ग्रामसेवक अरविंद गवई, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी सरपंच गंगाराम घाडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, गावातील जेष्ठ नागरिक नामदेव पवार, शशिकांत पवार, उदय पवार, महेश गोरिवले, संजय धनावडे, अशोक जालगावकर, लाईनमेन शुभम भाटकर तसेच वाडीतील सर्व स्थानिक मंडळी उपस्थित होती. त्यांचा तसेच वाडीतील जेष्ठ मंडळींचा प्रतिष्ठान तर्फे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

यावेळी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांची सामाजिक, शैक्षणिक तसेच शासकीय व निमशासकीय आणि ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निस्वार्थी व भरीव कार्य केल्याबद्दल National Rural Development Foundation Belgav या संस्थेतर्फे ८ नोव्हेंबर २०२२ रोजी बेळगाव येथे सन्मान करण्यात आला. या आदर्श सरपंच आंतरराज्य पुरस्काराची दखल घेऊन प्रतिष्ठानच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील सर्व वाड्यांच्या विकास कामांबाबत आराखडा आपल्या ग्रामपंचायत मध्ये तयार आहे. शासनाकडून तसेच लोकप्रतिनिधीं कडून निधी जसा उपलब्ध होईल त्या प्रमाणे गावातील विकास कामांची पुर्तता करता येईल. सद्या प्लास्टिक जन्य घटक, प्लास्टिकच्या बाटल्या / पिशव्या, लहान मुलांच्या खाऊची आवरणे इत्यादी वस्तू प्रत्येक वाडीसाठी दिलेल्या प्लास्टिक संकलन शेड मध्येच जमा झाले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता व घनकचरा योग्य ठिकाणीच जमा करून पर्यावरण व प्रदुषणाचा समतोलपणा राखून प्लास्टिक मुक्त आणि पर्यावरण पुरक गाव असे ध्येय व उद्दिष्ट साधण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. ग्रामस्थांची विकासासाठी सक्रिय सहभाग आणि साथ असेल तर ग्रामपंचायतीचा सुद्धा सहकार्याचा हात असेल, असेही सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानची सर्व स्थानिक तरूण मंडळी, महिला-पुरूष, स्थानिक अध्यक्ष महादेव आंबेकर, चिटणीस मोहन आंबेकर, खजिनदार अशोक पोस्कर आणि सर्व पदाधिकारी, मुंबई कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण आंबेकर सल्लागार गंगाराम आंबेकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत आंबेकर, सरचिटणीस मंगेश आंबेकर, सहसचिव मनोहर आंबेकर, संजय गावणंग, विश्वास आंबेकर, विजय आंबेकर, सुनील आंबेकर, सुरेश आंबेकर, विनोद आंबेकर, उत्कृष्ट सुत्रसंचालक विवेक आंबेकर तसेच सुरेश आंबेकर, प्रमोद पोस्कर, विजय आंबेकर, विलास आंबेकर, मनोहर आंबेकर आणि पडद्यामागील कलाकार म्हणून शशिकांत पोस्कर, महेश आंबेकर, धोंडू गावणंग व वासंती आंबेकर, मुंबई महिला मंडळ अध्यक्षा सविता गोणबरे, सचिव त्रिवेणी आंबेकर, नृत्य दिग्दर्शक आरूषी आंबेकर आणि मुंबईकर महीला पदाधिकारी व सदस्या या सर्वांचे बहूमोलाचे सहकार्य लाभले. Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahapuja of Shri Satyanarayana completed at UmrathMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.