जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्राम. उमराठ
गुहागर, ता. 16 : उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता यावे तसेच तरूण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, गावातील सामाजिक सलोखा जपला जावा आणि गावातील शहरी भागातील खेळाडू गावाकडे यावे या हेतूने आणि संकल्पने ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या सहकार्यांने सदर सरपंच चषक उमराठ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा शनिवार दि. १३ आणि रविवार दि. १४ मे २०२३ रोजी उमराठच्या घाडेवाडी येथील बाऊल नगरीत खेळवण्यात आल्या. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

सदर स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन, श्री गणेशाची पुजा, ग्रामदेवता श्री नवलाई देवी, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि खेळपट्टीची पुजा व श्रीफळ वाढवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गावातील वाड्यांचे वाडी प्रमुख, प्रतिष्ठित ग्रामस्थ महिला, पुरुष मंडळी आणि प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

यामध्ये गावातील १२ संघानी सहभाग घेतला होता. सर्वच संघांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आणि परिपूर्ण होती. त्यामुळे स्पर्धा अतिशय चुरशीची आणि क्षणाक्षणाला उत्कटा/ उत्सुकता वाढणारी होती. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुहागर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष चैतन्य धोपावकर तसेच वेळणेश्वर जि.प. गटाच्या माजी सदस्या सौ नेत्राताई ठाकूर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत सरपंच जनार्दन आंबेकर आणि संदीप गोरिवले यांनी करून यथोचित सन्मानही केला. सौ. नेत्राताई ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून मनोधर्य वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

स्पर्धेत ज्या संघाचे मैदानावर क्षेत्ररक्षण, क्षेत्ररचना, फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम असते ते संघ गुणवत्तेनुसार पुढे-पुढे येत असतात. त्या प्रमाणे अतितटीच्या आणि चुरशीच्या लढतीत अंतीम विजेते पदाचे मानकरी आंबेकरवाडीचा श्री भराडा क्रिकेट संघ आणि उपविजेता डागवाडीचा जागलेश्वर क्रिकेट संघ. तसेच मॅन ऑफ द सिरीज – ओंकार आंबेकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज – अमित आंबेकर तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरले शेखर आंबेकर. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

अंतिम विजेता आणि उपविजेता ठरलेल्या संघांबरोबरच सर्व सहभागी संघांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा. तसेच संदिप गोरिवले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतानाच शहरातील ग्रामस्थांना आणि खेळाडूंना गावासाठी स्पर्धा खेळण्यासाठी दोन दिवस वेळ द्यावा असे आवाहन केले. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ते श्री भराडा क्रिकेट संघातून पवन आंबेकर, शिल्पकार संघातून आयुष कदम, जालगावकर क्रिकेट संघातून यश कदम, यश जालगावकर, कोंडवीवाडी क्रिकेट संघातून राज गावणंग आणि गोरिवलेवाडी क्रिकेट संघातून भावेश गोरिवले, संस्कार गोरिवले आणि संचित गोरिवले हे १२ आणि १२ वर्षांखालील खेळणारे नवोदित किशोरवयीन खेळाडू. यांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी या सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक करून व पुष्पगुच्छ देऊन खास सन्मान केला आणि असेच उत्तम खेळाडू आपल्या उमराठ गावातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्थरावर पुढे गेले पाहिजेत असे सांगितले. या स्पर्धेचे मनोरंजन करणारे अव्वल दर्जाचे समालोचन (कॉमेट्री) विवेक आंबेकर, सचिन आंबेकर, विकास आंबेकर, निनाद कदम, वैभव धनावडे आणि उमेश गावणंग यांचेही स्वागत करण्यात आले. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

सदर स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान, सहकार्य देणारे जि. प. शाळा उमराठ नं.१ चे मुख्याध्यापक प्रदिप रामाणेसर, अनिल अवेरेसर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले तसेच गावातील सर्व जेष्ठ मंडळी आणि या स्पर्धेचे आयोजन गावातील सर्व तरूण मंडळी सरपंच चषक कमिटीचे अध्यक्ष गंगाराम माईन, सचिव जयेश पवार, खजिनदार नितीन गावणंग, उपसरपंच सुरज घाडे, प्रशांत कदम, प्रल्हाद पवार, महेश गोरिवले, क्षितिज गोरिवले, अजित गावणंग, श्रीकांत कदम, प्रशांत गोरिवले तसेच ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले, स्पर्धेसाठी मैदान जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठवाडीतील उदय पवार आणि पवार मंडळी यांचे तसेच यजमानपद घेऊन घाडेवाडी महिला व पुरुष मंडळींनी सर्वतोपरी चहापाणी व स्नॅक्स व जेवणाची सोय करून सहकार्य केल्याबद्दल तसेच कोंडवीवाडी महिला बचत गटाने स्नॅक्स व सरबत उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आभार मानले. Organized Sarpanch Cup Tournament at Umratha
