• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

MPL क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्वामी वॉरियर्स विजेता

by Ganesh Dhanawade
May 16, 2023
in Guhagar
90 1
0
MPL Cricket Tournament in Guhagar
176
SHARES
504
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मारुती छाया क्रिकेट संघ आयोजित

गुहागर, ता. 16 :  येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मिलिंद शेटे यांच्या ओम साई स्वामी वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले. रवींद्र विखारे यांच्या गणराज वॉरियर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. MPL Cricket Tournament in Guhagar

MPL Cricket Tournament in Guhagar

या स्पर्धेत ११० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मारुती छाया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू प्रवीण घाडे, गणेश धनावडे व चंद्रशेखर लोखंडे यांच्या हस्ते फीत कापून मैदानाचे, तर फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळाचे सागर मोरे, अर्जुन जांगली, किरण कला मंडळ मुंबईचे अध्यक्ष दत्तात्रय रेवाले, मारुती घाडे, किरण लोखंडे, वसंत ढेरे यांच्या हस्ते स्टमचे फीत सोडून करण्यात आले. MPL Cricket Tournament in Guhagar

MPL Cricket Tournament in Guhagar

आयपीएलच्या धर्तीवर गणराज वॉरियर्स, वेद वॉरियर्स, ओम साई स्वामी वॉरियर्स, लवेश फायटर, शालिनी इलेव्हन, कृष्णा वॉरियर्स, एस. पी. वॉरियर्स, रोनेड चॅम्पियन्स यांच्यामध्ये साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले. एकदिवसीय या स्पर्धेत आठ संघ साखळी पद्धतीने एकमेकांविरोधात लढले. अंतिम सामन्यात गणराज वॉरियर्स संघाने तीन षटकांमध्ये 30 धावांचे आव्हान दिले होते. सुरुवातीला ओम साई स्वामी वॉरियर्स संघाची एकतर्फी फलंदाजी सुरू होती. मात्र, विकेट पडताच दोन बॉल एक धावा अशा अटीतटीच्या सामन्यात ओम साई स्वामी वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले. MPL Cricket Tournament in Guhagar

MPL Cricket Tournament in Guhagar

विजेत्या संघाला 5555/- व चषक, उपविजेत्या संघाला 3333/- व चषक देवून गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून साहिल लोखंडे, उत्कृष्ट गोलंदाज वैष्णव लोखंडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अथर्व लोखंडे, षटकार किंग यश लोखंडे, अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकाविर म्हणून मिथिलेश लोखंडे, उगवता तारा म्हणून पारस कुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व खेळाडूंसाठी राज विखारे यांच्या गनराज इलेक्ट्रिकल तर्फे टीशर्ट वितरित करण्यात आले होते. MPL Cricket Tournament in Guhagar

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास किरण कला अध्यक्ष उदय लोखंडे, दत्तात्रय रेवाले, सुभाष घाडे, रवींद्र विखारे, मिलिंद शेटे, अनंत धनावडे, राजेश बेंडल, माजी नगरसेविका स्नेहल रेवाळे, महिला मंडळ अध्यक्ष अंजली लोखंडे, प्रदीप धनावडे, सुधीर धनावडे, किरण लोखंडे, प्रमोद लोखंडे, श्री. पोळेकर, महेश रेवाळे, एकनाथ जाधव, अजित पाष्टे, अमरदीप जाधव, रोहन विखारे, राज विखारे, चंद्रशेखर लोखंडे, शैलेश उदेक, धनंजय लोखंडे, निलेश लोखंडे, शुभम शेटे, पुष्कर शिंदे, शुभम चव्हाण, साहिल लोखंडे, महेश बेंडल, दीपक जाधव, निलेश लोखंडे, उमेश कुळे, सुहास जोशी, विश्वास जोशी, रवींद्र घाडे, आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते. MPL Cricket Tournament in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMPL Cricket Tournament in GuhagarNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.