डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर येणार
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या बुध्द विहाराचा २५ वा उदघाटन वर्धापन दिन दि. १७, १८, १९ मे २०२३ रोजी आयोजीत करण्यात आला आहे. भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षी, धम्मदिक्षा भूमीत आबलोली येथील आनंदवन बुध्द विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli
यावेळी भगवान गौतम बुध्द यांची २५६७ वी जयंती आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सुरेश सोन्या पवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या संपुर्ण कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील जनतेने बहूसंख्येने वेळेत उपस्थित रहावे, असे जाहिर आवाहन आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्ताराम कदम गुरुजी, सेक्रेटरी अविनाश कदम, मुंबई संस्थेचे सेक्रेटरी अनिल कदम यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli
या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार दिनांक १७ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते ९:३० वा. भन्ते महेंद्रा बोधी ( बदलापूर) या भन्तेजींचे आगमन, सकाळी ९:३० ते १०:०० वाजता ध्वजारोहन व बुध्दपुजा पाठाचा कार्यक्रम, सकाळी १० ते ११:३० या वेळेत स्वागत समारंभ व मान्यवरांचा सत्कार सोहळा, ११:३० वाजता आदरणीय भन्ते महेंद्रा बोधी (बदलापूर) यांची बुध्द आणि त्यांचा धम्म व सद्यस्थिती या विषयावर धम्मदेसना हा कार्यक्रम, दुपारी २:०० वाजता स्नेहभोजन त्यानंतर रात्रौ ८:०० वाजता आनंदवन बुध्द विहार आबलोली कला विभाग महिला मंडळ यांचा सांस्कृतीक कार्यक्रम व नृत्य नाटीका हे कार्यक्रम सादर होणार आहेत. Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli

गुरुवार दिनांक १८ मे २०२३ रोजी सकाळी ९:३० ते १० वाजता दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया – तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर यांचे बुध्द विहारात आगमन, सकाळी १० ते १०:३० वाजता ध्वजारोहन व बुध्द पुजापाठ, सकाळी १०:३० ते १२ वाजता स्वागत समारंभ व मान्यवरांचा सत्कार सोहळा, दुपारी १२ वाजता जाहिर सभा विषय – १) धर्माच्या नावावरुन चाललेले राजकारण व अघोषीत आणिबाणी यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात २) भारतीय संविधानास झुगारणार तर देशास मुकणार आणि ३) सद्यस्थिती या विषयांवर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया – तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजरत्न अशोकराव आंबेडकर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील, या जाहिरसभेची प्रस्तावना समाजरत्न पुरस्कार प्राप्त जेष्ठ मार्गदर्शक बबनराव कदम हे करणार आहेत दुपारी २ वाजता स्नेहभोजन आणि रात्रौ ९ वाजता आयु. मिलिंद रामचंद्र कडवईकर, योगेश उत्तमबाई देऊ पवार, राकेश गौतम कदम यांच्यावतीने आनंदवन बुध्द विहार कला विभाग सादर करीत आहे. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समीती जिल्हा रत्नागिरी या संस्थेचा अंधश्रध्दा निर्मुलनचा प्रात्याक्षिकासह प्रबोधनाचा कार्यक्रम, रात्रौ १० वाजता लेखक, दिग्दर्शक सिध्दार्थ सखाराम पवार, निर्माता प्रमोद गंगाराम पवार, सौ.प्रतिक्षा सिध्दार्थ पवार, पाऊल निर्मित मुंबई, आनंदवन बुध्द विहार कला विभाग या नाट्य संस्थेचा “आंम्ही भारतीय” हि नृत्य नाटीका, नाट्य प्रयोग सादर होणार आहे. Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli
शुक्रवार दिनांक १९ मे २०२३ रोजी सकाळी १० ते १०:३० वाजता ध्वजारोहन व बुध्दपुजापाठ, सकाळी १०:३० ते १२ या वेळेत स्वागत समारंभ व जेष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा, दुपारी १२ वाजता जाहिर सभा, दुपारी २ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम, रात्रौ ८:३० वाजता उदय शिवराम पवार यांचे सौजन्याने आर्केस्ट्रा (क्रांतीची पाऊले) असा भव्य दिव्य कार्यक्रम आनंदवन बुध्द विहार आबलोली येथे संपन्न होणार आहे. Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli
