गुहागर, ता. 15 : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. MPL Cricket Tournament in Guhagar


या स्पर्धेचे उद्घाटन किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मारुती छाया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू प्रवीण घाडे, गणेश धनावडे व चंद्रशेखर लोखंडे यांच्या हस्ते फीत कापून मैदानाचे, तर फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळाचे सागर मोरे, अर्जुन जांगली, किरण कला मंडळ मुंबईचे अध्यक्ष दत्तात्रय रेवाले, मारुती घाडे, किरण लोखंडे, वसंत ढेरे यांच्या हस्ते स्टमचे फीत सोडून करण्यात आले. आयपीएलच्या धर्तीवर गणराज वॉरियर्स, वेद वॉरियर्स, ओम साई स्वामी वॉरियर्स, लवेश फायटर, शालिनी इलेव्हन, कृष्णा वॉरियर्स, एस. पी. वॉरियर्स, रोनेड चॅम्पियन्स यांच्यामध्ये साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले. MPL Cricket Tournament in Guhagar

उद्घाटन कार्यक्रमास किरण कला अध्यक्ष उदय लोखंडे, दत्तात्रय रेवाले, सुनील गोयथळे, अनंत मालप, श्रीधर कुळे, सुधीर धनावडे, महेश रेवाळे, अमरदीप जाधव, रोहन विखारे, राज विखारे, चंद्रशेखर लोखंडे, शैलेश उदेक, धनंजय लोखंडे, निलेश लोखंडे, शुभम शेटे, पुष्कर शिंदे, शुभम चव्हाण, साहिल लोखंडे, महेश बेंडल, दीपक जाधव, उमेश कुळे, सुहास जोशी, विश्वास जोशी, रवींद्र घाडे, आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते. MPL Cricket Tournament in Guhagar

