• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अमली पदार्थाची तस्करी करणारे गजाआड

by Mayuresh Patnakar
May 15, 2023
in Ratnagiri
59 0
0
Drug traffickers jailed
115
SHARES
329
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

रत्नागिरी, ता. 15 : मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी – विक्री करत आहेत अशी माहिती मिळत होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. विनीत चौधरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/अंमलदार यांना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे रोज निहाय अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम चालू होते. Drug traffickers jailed

दिनांक 14/05/2023 रोजी 02.00 वा. च्या दरम्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. आकाश साळुंखे व पोलीस अंमलदार हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील पार्सल गेट मधून पार्किंग कडे जाणाऱ्या रोडवर पायी पेट्रोलिंग करीत जात असताना रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे अभिलेखावरील असलेले, माहितगार गुन्हेगार संदिप गोविंद शिवगण, रा. धनजीनाका रत्नागिरी, आकीब खालीद काझी रा. गवळीवाडा रत्नागिरी व तौसिफ आसिफ मिरजकर रा. राहुल कॉलनी गवळीवाडा, रत्नागिरीत हे तिघे एकत्रीत संशयास्पद हालचाल करत असताना दिसून आल्याने त्यांना जागीच थांबवून त्यांची पंचांचे समक्ष चौकशी व अंग झडती घेण्यात आली. Drug traffickers jailed

या तीनही संशयीत इसमांचे अंगझडती मधून व घटनास्थळी एकूण 21.78 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमली सदृश पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने गैरकायदा स्वतःच्या जवळ बाळगल्या स्थितीत मिळून आला.  म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. 128/2023 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22 (ब), व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. Drug traffickers jailed

ही कारवाई, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील श्री. आकाश साळुंखे, पोलीस उप निरीक्षक, श्री. प्रसाद घोसाळे, पोहेकाँ/615, श्री. गणेश सावंत, पोहेकाँ/306, श्री. प्रविण बर्गे, पोहेकाँ/1239, श्री. अमोल भोसले, पोहेकाँ/1399, श्री. आशिष भालेकर, पोना/1112, श्री. विनय मनवल, पोना/1273, श्री. रत्नकांत शिंदे, पोना/1526 व श्री. पंकज पडेलकर, पोना/1447 या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. Drug traffickers jailed

Tags: CrimeDrug traffickers jailedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarक्राईमगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.