• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला

by Mayuresh Patnakar
May 13, 2023
in Maharashtra
73 1
0
Cyclone Mocha risk increased
143
SHARES
409
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Cyclone Mocha risk increased

या चक्रीवादळामुळे १७५ किलोमीटर वेगाने वाहने वाहणार असून मच्छिमार, जहाजे, बोटी आणि ट्रॉलर यांना मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरांत आणि उत्तर अंदमान समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, भारताच्या अनेक भागात पाऊस पडण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनडीआरएफ सक्रिय झाले आहे. मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या आठ टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. मोचा चक्रीवादळ १२ मे रोजी तीव्र होईल आणि १४ मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होईल. संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी ८ टीम तैनात केल्या आहेत. तर, एनडीआरएफचे २०० बचावकर्ते कार्यरत असून १०० बचावकर्ते राखीव ठेवण्यात आले आहेत. Cyclone Mocha risk increased

भारतात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवार दि. १४ मे नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ भारताच्या दक्षिण किनारी भाग, ओडिशा आणि अग्नेय गंगा पश्चिम बंगालमधून जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता चक्रीवादळाच्या क्षेत्राचे निरीक्षण केल्यानंतर ते बंगालच्या उपसागरातून पुढे सरकले असून ते उत्तर-ईशान्य बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे वळले असल्याची माहिती आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालचा उपसागर, अंदमानचा समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमार जहाजे, बोटी, ट्रॉलर यांनी अग्नेय बंगालच्या उपसागरात १२ मेपर्यंत आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. Cyclone Mocha risk increased

Tags: AndamanBengalCyclone Mocha risk increasedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMocha CycloneNDRFNews in GuhagarUpdates of Guhagarअंदमानगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याबंगालमराठी बातम्यामोचा चक्रीवादळलोकल न्युज
Share57SendTweet36
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.