गुहागर ता. 12 : जि.प.आदर्श शाळा सडे जांभारी नं-२ केंद्र आबलोली येथे शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा दि. ८/०५/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक सन्मान, जेष्ठ नागरिक सन्मान, चंद्रकांत आलीम यांचा सन्मान करण्यात आला. Amrit Mahotsav of Sade Jambhari School

या अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त स. ८.०० वाजता शिवसृष्टी शोभा यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची बॅंजोपथकाद्वारे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शिवपुतळ्याचे पूजन झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेझीम नृत्य व झांज पथक नृत्याने उपस्थितांचे स्वागत केले. आजी माजी विद्यार्थी व शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या उपस्थितीने शाळेतील वातावरण उत्साहाने, नवचैतन्याने भारावून गेले. त्यानंतर उपस्थित सचीनशेठ बाईत, विलासदादा गुरव, खोडदे उपसरपंच गुरव मॅडम तसेच माजी शिक्षक यांचे व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ बंधू भगिनी यांचे स्वागत करण्यात आले. Amrit Mahotsav of Sade Jambhari School
श्री सत्यनारायणाच्या महापूजेनंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर महीलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. स्नेहभोजनाचा लाभ घेतल्यानंतर जेष्ठांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. शाळेतील उपस्थित माजी शिक्षक श्री पड्याळ गुरूजी, जनार्दन पालशेतकर गुरूजी, रमेश पालशेतकर, सुनील करंबेळे, धोंडू करंबेळे, करंबेळे बाई, बजरंग गुरसळे, संजय बैकर, प्रीया गुहागरकर, अनंत पागडे इ. माजी शिक्षक उपस्थित होते. Amrit Mahotsav of Sade Jambhari School

त्याचप्रमाणे नरेश निमुणकर, संदिपजी निमुणकर, पोलीस पाटील सुर्वे, राजेश सोलकर, तसेच सरपंच वनिता डिंगणकर, शा.व्य.समिती अध्यक्ष अंकुश माटल, मारूती बारस्कर सर, अमृत महोत्सव कमिटी अध्यक्ष अंकुश माटल यादी मान्यवर तसेच वाडी प्रमुख महादेव माटल, गोविंद वेलुंडे, रत्नाकर सोलकर, पांडुरंग बारस्कर, गणपत वेलुंडे, वाडीमंडळ अध्यक्ष, अरूण घेवडे, एकनाथ वेलुंडे, अनंत वेलुंडे, शंकर दावडे, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर तसेच आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते. माजी शिक्षक यांनी १९७४ पासूनच्या शालेय आठवणी जागृत केल्या. Amrit Mahotsav of Sade Jambhari School
शाळेचे मुख्याध्यापक उदय गोरीवले सर, पदवीधर शिक्षक, माजी प्र.केंद्रप्रमुख, आदर्श शिक्षक रविंद्र कुळये सर, उपशिक्षिका पल्लवी डिंगणकर बाई, यांचा ग्रामस्थांमार्फत यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक सन्मान, जेष्ठ नागरिक सन्मान, चंद्रकांत आलीम यांचा सन्मान करण्यात आला. शाळेसाठी वस्तूरूप, चित्ररूप, आर्थिक स्वरूपात देणगी देणाऱ्या देणगीदारांचा, शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शालेय गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. Amrit Mahotsav of Sade Jambhari School

त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत शालेय आजी माजी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला व त्यानंतर रात्री गणगौळण, वगनाट्याच्या बहारदार कार्यक्रमाने अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कुळये सर यांनी केले. Amrit Mahotsav of Sade Jambhari School
