राजिवलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गुहागर ता. 12: संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe
लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरपंच व उपसरपंच लाच मागत असल्याची तक्रार या विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राचे वतीने सदर ग्रामपंचायत चे अखत्यारीतील पाखाडी तयार करणेचे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून इतर लोकसेवक प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजिवली व इतर लोकसेवक सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजिवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांचेकडे रु. ४०,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु. ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी रु. १५,०००/- सरपंच प्रशांत शिर्के यांनी व रू. १५,०००/- उपसरपंच सचिन पाटोळे यांनी आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले असून यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी- श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र.वि, रत्नागिरी, मार्गदर्शन अधिकारी- श्री. सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, ला. प्र. वि. ठाणे परिक्षेत्र, ठाणे, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी- मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, प्रवीण ताटे, पोलीस निरीक्षक, सपोफौ/ संदीप ओगले, पोहवा/ विशाल नलावडे, मपोहवा/ श्रेया विचारे,पोना/ दीपक आंबेकर, पोशि/ राजेश गावकर व चापोना/प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली. Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा कारवाईच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचा विभाग आहे, अनेक कठोर कारवाई करून अनेकांना तुरुंगात पाठवले आहे. या सर्व प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत व नियोजनबध्द आखणी महत्वपूर्ण असल्यामुळे अनेक यशस्वी कारवाई होत आहे. त्यामुळे अशा प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. दरम्यान, सरपंच व उपसरपंच हे दोघेही लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले गेल्याने या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe
