संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश
मयूरेश पाटणकर,
गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding
गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding
कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर पडणे शिल्लक आहे. सोमवारी 8 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर या घरट्यातून किती पिल्ले बाहेर पडतील याबाबत साशंकता आहे. Records in turtle conservation but failure in breeding
ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यात गुहागरची टीम यशस्वी झाली असली तरी प्रजनन दराच्या बाबतीत हे मोठे अपयशच म्हणावे लागेल. यावर्षी अवकाळी पाऊसाबरोबरच सातत्याने असलेले ढगाळ वातावरण हे प्रजनन दर कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय आणखी कोणती कारणे आहेत. ती शोधण्याचे आवाहन कासव मोहिमेशी संबंधित सर्वांसमोर आहे. Records in turtle conservation but failure in breeding
मंडणगड तालुक्यातील वेळास येथे जिल्ह्यातील पहिल्या कासव संवर्धन मोहिमेला सुरवात झाली. याठिकाणी संवर्धीत अंड्यांचा प्रजनन दर सातत्याने 50 ते 90 टक्के ठेवण्यात यश मिळाले आहे. याबाबत बोलताना कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोहन उपाध्ये म्हणाले की, कासवाची अंडी दोन तासांच्या आत पुन्हा संवर्थन केंद्रातील खड्ड्यांत जातील याकडे आमचे लक्ष असते. भरती रेषेच्या बाहेर घरटे सापडल्यास आम्ही ते घरटे तेथेच संवर्धित करतो. संवर्धनासाठी योग्य जागेची निवड ही सर्वांत महत्त्वाची असते. झाडांची सावली, खड्ड्यांच्या आत शिरणारी गवताची किंवा झाडांची मुळे तेथील वाळु घट्ट करतात. अंड्यांना दुखापत करतात. संवर्धन केंद्रामधील खड्ड्यांमध्ये सतत होणारी सुक्ष्म हालचालही प्रजनन दरावर मोठा परिणाम करते. Records in turtle conservation but failure in breeding