नाव नोंदणी अंतिम तारीख १८ मे पर्यंत
रत्नागिरी, ता. 09 : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचे दि. २१ ते २८ मे २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २२ मे रोजी स. ११ वाजता ऐतिहासिक पतितपावन मंदिरात जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा खुल्या गटात होणार आहेत. On the occasion of Savarkar Jayanti Rangoli competition
यामध्ये स्वा.सावरकर यांच्या जीवन प्रसंगावर रांगोळी काढायची आहे. प्रथम क्रमांक रू. ५०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रू. ३००० व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक २०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. १००० सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. On the occasion of Savarkar Jayanti Rangoli competition

दि. २२ मे २०२३ रोजी स. ११.०० वाजता स्पर्धेला सुरवात होईल. यामध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ, रांगोळीसाठी जागा स्पर्धेवेळी सांगण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे देण्याची अंतिम तारीख १८ मे पर्यंत राहिल. स्पर्धकांनी आपली नावे संपर्क कमिटीकडे वेळेत द्यावीत. बक्षीस वितरण समारंभ २८ मे रोजी सकाळी ११.०० वा. पतितपावन मंदिर, रत्नागिरी या ठिकाणी होईल. On the occasion of Savarkar Jayanti Rangoli competition
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी सौ. अनघा निकम – मगदूम, मोबा. ९४२२३७१९०७ आणि मंगेश मोभारकर मोबा. ८७६६४३२८६४ यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन विवेक व्यासपीठतर्फे करण्यात आले आहे. On the occasion of Savarkar Jayanti Rangoli competition
