• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री वराती देवीच्या सोहळ्यास प्रारंभ

by Ganesh Dhanawade
May 8, 2023
in Guhagar
117 1
0
Celebrations of Sri Varati Devi
230
SHARES
657
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ, गुहागर आयोजित

गुहागर, ता. 08 :  सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ आयोजित सोहळ्याला रविवारी पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आणि पुरुष – महिलांनी बांधलेले फेटे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. Celebrations of Sri Varati Devi

Celebrations of Sri Varati Devi

श्री वराती देवीवर सर्व भाविकांची अपार श्रद्धा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. दरवर्षी मे महिन्यात देवीच्या मंदिराचा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यानिमित्त रविवारी ७ मे रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ५.३० वाजता गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी येथील महिला व पुरुषांनी ढोल वादनाचा आनंद लुटला. सोमवार ८ रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, श्री सत्यनारायणाची महापूजा, सायं. ४ वा. कलावती आईंचे भजन, सायं. ५ वा. पासून सिंगळबारी भजन, ७ वा. देवीची महाआरती, सायं. ७.३० वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. डोंबिवली येथील श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ व परेल मुंबई येथील श्री विमलेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ यांचा डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे. Celebrations of Sri Varati Devi

मंगळवार ९ रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ४ ते ६ वा. हळदीकुंकू, ७ वा. देवीची महाआरती, रात्री ९.३० वा. महिला व लहान मुलांसाठी फनी गेम, १० रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, सायं. ७ वा. देवीची महाआरती, रात्री ९.३० वा. ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा, गुरुवार दि. ११ रोजी सकाळी देवीची षडोशोपचार विधिवत पूजा, कुंकूमार्जन सोहळा, सायं. ७ वा. देवीची महाआरती, रात्री ७.३० ते रात्री १० वा. देवीचा महाप्रसाद, रात्री १० वा. वरवेली खालचीवाडी येथील नवतरुण नमन मंडळाचा बहुरंगी नमन सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. Celebrations of Sri Varati Devi

Tags: Celebrations of Sri Varati DeviGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.