दि. 8 ते 31 मे 2023 या कालावधीत राबविणार
गुहागर, ता. 07 : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने, राज्यातील रस्ता सुरक्षा विषयक समिती, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच जिल्ह्यांतर्गत येणारे परिवहन विभाग यांच्याशी निगडीत विविध उपाययोजना संदर्भात निर्देश दिले आहे. या निर्देशाच्या अनुषंगाने दि. 8 मे 2023 ते 31 मे 2023 या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने पुढील गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यात येणार आहे. Special inspection drive by Transport Department
• विना हेल्मेट वाहन चालविणे
• विना सीटबेल्ट
• विना अनुज्ञप्ती
• वाहनाचा विमा / वायूप्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी)
• धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे
• आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे
• पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालविणे
याबाबत तसेच इतर गुन्ह्यांबाबत इत्यादींची तपासणी या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Special inspection drive by Transport Department
