• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डीआरडीओच्या संचालकाला एटीएसने केली अटक

by Mayuresh Patnakar
May 7, 2023
in Bharat
87 1
0
DRDO director arrested by ATS
172
SHARES
491
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय?

गुहागर ता. 07 : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसने अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. DRDO director arrested by ATS

संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या संचालकाने हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑफिसरला दिल्याचा संशय आहे. निवृत्तीला ६ महिने राहिले असताना ते हनीट्रॅपमध्ये फसले असल्याचे बोलले जात आहे. हे संचालक मोबाईलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. DRDO director arrested by ATS

हे संचालक पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाशी व्हॉट्सअँप व्हाईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. याप्रकरणी त्यांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. DRDO director arrested by ATS

मिळालेल्या माहितीनुसार, डी.आर.डी.ओ.चे हे संचालक पुणे येथील त्यांच्या कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना भारताचे शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाशी संपर्कात होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटअँपद्वारे व्हाईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते पाकिस्तानच्या हस्तकाच्या संपर्कात राहिले. डी.आर.डी.ओ.च्या या संचालकाने पदाचा गैरवापर करत कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे असलेली आणि भारताच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकेल अशी संवेदनशील माहिती शत्रु राष्ट्राला अनधिकृतरित्या पुरवली. असे तपासात आढळून आल्याने त्यांना महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. DRDO director arrested by ATS

Tags: DRDODRDO director arrested by ATSGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share69SendTweet43
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.