• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली वरची पागडेवाडी येथे सुवर्ण महोत्सव सोहळा

by Ganesh Dhanawade
May 6, 2023
in Guhagar
96 1
0
Golden Jubilee Ceremony at Aabaloli
189
SHARES
541
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या कुणबी समाजाच्या विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रविवार दि ७ ते १० मे या कालावधीत विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. Golden Jubilee Ceremony at Aabaloli

सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त महिला व पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी पैठणी खेळ तसेच लहान व मोठ्या गटात मुले – मुली गोणता उडी, वॉटर रेस, बास्केट बॉल, महिला माहेरवाशिनी आणि मुलींच्या संगीत खुर्चा खेळ घेणयात येणार आहेत. दि. ९ मे रोजी सर्व वयोगटातील व्यक्तींचे सायंकाळी ७.३० वा. रेकॉर्ड डान्स होणार आहेत. दि. १० मे रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, दुपारी २ वा. प्रमूख मान्यवरांची उपस्थिती, स्वागत तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवीलेले प्रगतशील शेतकरी श्री. सचिन कारेकर यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळॎ व बक्षिस वितरण समारंभ, सायंकाळी ४ वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वा. महाप्रसाद, रात्रौ १० वा. आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळाचा बहारदार नमनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. Golden Jubilee Ceremony at Aabaloli

तरी आपण सर्वींनी उपस्थित रहावे, अशी विनंती वरची पागडेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष मधुकर गोपाळ पागडे, सेक्रेटरी गोविंद भिकाजी पागडे, उपाध्यक्ष रमेश पागडे, खजिनदार सुर्यकांत पागडे, उपसेक्रेटरी अनिकेत पागडे, उपखजिनदार प्रकाश पागडे यांनी केले आहे. Golden Jubilee Ceremony at Aabaloli

Tags: Golden Jubilee Ceremony at AabaloliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.