• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे ग्रामस्थ शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम

by Ganesh Dhanawade
May 1, 2023
in Guhagar
130 1
0
Padve villagers with Shiv Sena party
256
SHARES
730
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पडवेतील पाच मोहल्ल्यातील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंत व शिवसेनेला पाठींबा

गुहागर, ता. 01 :  गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिल्यानंतर जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. असे चित्र पहावयास मिळत आहे. नुकतेच पडवे मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी एकमताने पालकमंत्री सामंत व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा शब्द दिला आहे. Padve villagers with Shiv Sena party

पडवे मोहल्ल्यातील विविध कामांची मागणी करत पाठींबा दर्शविला. यात प्रामुख्याने पडवे प्रवाशी जेट्टी ते सईद राजपुरकर घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे, पडवे ग्रा.पं. माडातील प्रवाशी जेट्टी ते इब्राहिम खले पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, दाऊद जांभारकर घर ते अफजल जांभारकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, आफताब दाभोळकर घर ते राजापुरकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे, टेमकर कब्रस्तानला कंपाऊंड वॉल बांधणे इ विकास कामांची मागणी करण्यात आली. Padve villagers with Shiv Sena party

Padve villagers with Shiv Sena party

गुहागर शिवसेना तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत पडवे पाच मोहल्यातील ग्रामस्थांनी बैठक घेवुन आपल्या गेल्या अनेक वर्षापासुनच्या विकासकामांच्या व्यथा मांडल्या. पडवे गावाचा विकास अनेकवर्षे मागे गेला. यामध्ये बदल व्हावा आणि तो शिवसेना पक्ष व पालकमंत्री सामंतच करु शकतात असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी पाठींबा दर्शविला आहे. यावेळी पाच मोहल्ल्यातील प्रमुख गावातले सरपंच मुजीब जांबारकर, अमानत जांबारकर, अरमान भाई, आसिफ खले, मकबुल जांबारकर मुजिम जांभारकर, नजीर जांभारकर, हनिफ जांभारकर, मकबुल जांभारकर, अब्रार तवसाळकर, अमानत जांभारकर, बद्रुद्दीन तवसाळकर, शोकत जांभारकर, रफीक सारंग, फारुख गुहागरकर, मुहाम्मद मुजावर, झईद भाटकर, अरमान शिरगावकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Padve villagers with Shiv Sena party

यावेळी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी आपली विकासकामे लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातुन पुर्ण करु असे आश्वासन दिले. कामाची चिंता करु नका आम्ही विकासकामांसाठीच प्रयत्नशील आहोत असे सांगितले. या भेटीवेळी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, सह युवा तालुका प्रमुथ रोहन भोसले, उपतालुका प्रमुख सुभाष (भाऊ) काजरोलकर, विभागप्रमुख महेश जामसुतकर, संदेश कचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. Padve villagers with Shiv Sena party

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPadve villagers with Shiv Sena partyShiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.