गुहागर नगरपंचायत, पहिल सभा ऑनलाइन होणार
गुहागर, ता. 28 : नगरपंचायतीच्या विकास आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांची पडताळणी करण्यासाठी, सुनावणी घेण्यासाठी 7 सदस्यीय नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सभा कधी होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. समितीची पहिली सभा ऑनलाइन पध्दतीने होईल, असे खात्रीलायक वृत्त आहे. Planning Committee formed for Development Plan
गुहागर शहराच्या विकास आराखड्यावर 1501 हरकती व सूचना नगरपंचायतीमध्ये दाखल झाल्या. या हरकती व सूचनांवर निर्णय घेण्यासाठी 7 सदस्यांची नियोजन समिती गठीत करण्यात येणार होती. यापैकी 3 सदस्य हे नगरपंचायतीच्या स्थायी समितीमधुन घेतले जाणार होते. त्यांनी नावे गुहागर नगरपंचायतीने यापूर्वीच नगर रचना कार्यालय रत्नागिरीला कळविली होती. त्यामध्ये नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्ष सौ. प्रणिता साटले व स्थायी समितीच्या सदस्या सौ. मनाली सांगळे यांचा समावेश आहे. उर्वरित चार सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना कार्यालयांचे संचालकांद्वारे होणार होती. 20 एप्रिलला अविनाश पाटील, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य यांचे सदस्य नियुक्तीबाबतचे पत्र गुहागर नगरपंचायतीला मिळाले. त्याप्रमाणे सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचनाकार मिलिंद गुलाबराव आवडे, सेवानिवृत्त नगर रचनाकार शिवप्रसाद आत्माराव धुपकर, सेवानिवृत्त नगररचनाकार शेखर दत्तात्रय चव्हाण आणि वास्तुविशारद प्रियदर्शन श्रीधर कोपरकर यांची नियुक्ती गुहागर नगरपंचायतीच्या नियोजन समितीवर करण्यात आली आहे. त्यामुळे नियोजन समिती गठित करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. Planning Committee formed for Development Plan
या समितीची पहिली बैठक लवकरच ऑनलाइन पध्दतीने होईल. या बैठकीमध्ये समिती सदस्यांचा परिचय, गुहागर शहर विकास आराखड्यांतील हरकतींविषयी माहिती घेणे, असे विषय होतील. अशी खात्रीशीर माहिती आहे. सध्या गुहागर नगरपंचायत कार्यालयात नागरिकांकडून आलेल्या हरकतींचे वर्गीकरण सुरु आहे. वर्गीकरण झाल्यानंतर सुनावणी कशी घ्यायची याचे धोरण नियोजन समिती ठरवेल. Planning Committee formed for Development Plan
10 मे रोजी गुहागर नगरपंचायतीची मुदत संपत आहे. त्यामुळे अवघे काही दिवस हातात असताना समितीमधील 3 लोकप्रतिनिधीची भुमिका कशी असेल. मुदत संपल्यानंतर 3 लोकप्रतिनिधींचे नियोजन समितीमधील सदस्यत्व रद्द होईल की राहील. सदस्यत्व रद्द झाले तर रिक्त पदे कशी भरणार. नियोजन समितीच्या सलग बैठका होऊ शकतात का. शासननियुक्त सदस्य अशा सभांना कसे उपस्थित रहातील. आदी माहिती घेण्याचे काम सध्या नगराध्यक्ष राजेश बेंडल करत आहेत. Planning Committee formed for Development Plan