सह्याद्रि शिक्षण संस्था संचलित उन्हाळी पूर्वतयारी उद्बोधन वर्ग
गुहागर, ता. 26 : न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर विद्यालयात सोमवार दिनांक २४/०४/२०२३ पासून इ. १० वी उन्हाळी पूर्वतयारी उद्बोधन वर्ग मार्गदर्शन शिबिर सुरू झाले आहे. सदर शिबिर सह्याद्रि शिक्षण संस्था संचलित दि.२४/०४/२०२३ ते दि.२९/०४/२०२३ या कालावधीत होणार आहेत. Mentoring Camp at Velaneshwar School
या शिबिराचे संयोजक मा.श्री.शरद जोशी, मा.श्री.शशिकांत जोशी या मान्यवरांचा शालेय समितीचे चेअरमन मा.श्री.पोसकर व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. शिंदे यांच्याहस्ते तर मा.सौ.गौरी नातू यांचा सौ.पौसकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून श्री.लादे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. Mentoring Camp at Velaneshwar School

यावेळी मा.श्री. शरद जोशी सर यांनी आपल्या मनोगतातून “साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट,वेळणेश्वर” (Saath Saath Charitable Trust, Velaneshwar) या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम कशाप्रकारे राबविले जातात याविषयी माहिती दिली. तर अॅडव्होकेट सौ.गौरी नातू यांनी मनोगत व्यक्त करताना सदर शिबिराची रूपरेषा स्पष्ट करत विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओ क्लिप प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवून, विविध शैक्षणिक उपक्रम कशाप्रकारे राबविले जातात याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक मा.श्री.शिंदे सर यांनी जोशी कुटुंबिय शैक्षणिक क्षेत्रात राबवित असलेले उपक्रम हे स्तुत्य असून त्यांच्या पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होवून त्यांच्या मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. Mentoring Camp at Velaneshwar School

कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे चेअरमन मा.श्री.पोसकर सर यांनी जोशी कुटुंबियांनी आयोजित केलेले शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरच्या निवडीसाठी सुवर्णसंधी आहे. हे विषद करून पुढील शैक्षणिक वर्षात स्पर्धा परीक्षा दृष्टीने व इ.10 वी च्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अशाप्रकारची शिबिरे आयोजित करणेस प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी कु.स्वरा नातू व कु.आरोही जगदाळे, शिक्षक श्री शिंदे डी.जी व श्री.पाटील सर उपस्थित होते. आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक श्री मांजरे सर यांनी केले. Mentoring Camp at Velaneshwar School
