• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

by Guhagar News
April 26, 2023
in Bharat
60 0
0
Inauguration of statue of Chhatrapati Shivaji Maharaj
118
SHARES
336
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 :  महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे. Inauguration of statue of Chhatrapati Shivaji Maharaj

मॉरिशसमध्ये सुमारे 75 हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे 54 संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. या फेडरेशनची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवनसुद्धा उभारण्यात आले असून, त्याच्या विस्तारासंदर्भातील सुद्धा काही मागण्या आहेत. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात. या टप्पा-2 साठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 8 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. Inauguration of statue of Chhatrapati Shivaji Maharaj

मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी 8 मार्च 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी आपला मनोदय व्यक्त केला होता. या दौर्‍यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटणार असून, काही सामंजस्य करारावर सुद्धा स्वाक्षरी होणार आहेत. या दौऱ्यात पर्यटन अणि उद्योग क्षेत्रात महत्वाचे करार अपेक्षित आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे भेटणार आहेत. Inauguration of statue of Chhatrapati Shivaji Maharaj

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of statue of Chhatrapati Shivaji MaharajLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMauritiusNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामॉरिशसलोकल न्युज
Share47SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.