• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात इंग्रजी भाषा दिन साजरा

by Ganesh Dhanawade
April 26, 2023
in Guhagar
48 0
0
English language day celebrated in Patpanhale school
94
SHARES
269
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मीरा कोलकांडचे चित्र व माहिती विशेष आकर्षण

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (New English School and Junior College, Patpanhale) या विद्यालयात इंग्रजी भाषा दिन नुकताच साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. English language day celebrated in Patpanhale school

इंग्रजी भाषा दिन कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून कविता, विविध विषयांवरील माहिती, इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध कवी व नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्याबद्दल माहिती सादर केली. विद्यालयातील कु. मीरा कोलकांड हिने विल्यम शेक्सपियर यांचे रेखाटलेले चित्र व सादर केलेली माहिती कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली. English language day celebrated in Patpanhale school

English language day celebrated in Patpanhale school

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एम. ए. थरकार यांच्या हस्ते इंग्रजी साहित्यिक, कवी, नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीमधील कु. भक्ती दीक्षित, पुनम मोहिते, पूर्वा माळी, शमिका भिडे, सार्थक मेस्त्री, मृण्मयी जाधव, मीरा कोलकांड या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून कविता, विविध विषयांवरील माहिती, इंग्रजी भाषा दिनाचे महत्त्व, इंग्रजी भाषा विषयक साहित्यिक , कवी, नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जीवन परिचय या विषयांबाबत माहिती सादर केली. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विषय शिक्षिका सौ. एन.पी. वैद्य यांनी केले होते. English language day celebrated in Patpanhale school

कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांनी इंग्रजी भाषा दिन कार्यक्रमात सहभागी झालेल्या व इंग्रजी मधून सादर केलेल्या माहितीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. इंग्रजी भाषा दिन व इंग्रजी भाषेचे महत्व याबाबत श्री थरकार यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी विषय शिक्षिका सौ. एन.पी. वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी श्री.एस. वाय भिडे, श्री.एस. एम. आंबेकर, इंग्रजी विषय शिक्षिका सौ. एन. पी. वैद्य उपस्थित होते. English language day celebrated in Patpanhale school

Tags: English language day celebrated in Patpanhale schoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.