शिबिरासाठी मूक बधीर व कर्णबधीर 48 दिव्यांगांनी सहभाग नोंदविला
गुहागर, ता. 25 : तालुका अपंग पूनर्वसन संस्था व मा.सुरेंद्र तथा बाळासाहेब माने संचालित यश फाउंडेशंन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मूक बधीर व कर्णबधीर दिव्यांगांसाठी मोफत जिल्हास्तरीय एक दिवशीय व्यवसाय मार्गदर्शन शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्हयातील एकूण 48 दिव्यांगांनी सहभाग नोंदविला. Business guidance camp held in Guhagar
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.अरुण फाटक, मा. गजानन रजपूत कर्णबधीर विद्यालय रत्नागिरी, संस्थेचे सल्लागार मा.अरुण मुळे, मा.विनायक ओक, प्रकाश बापट, संस्थेचे अध्यक्ष मा.उदय रावणंग, सरचिटणीस श्री.सुनिल रांजाणे, खजिनदार श्री.सुनिल मुकनाक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा.सुरेंद्र तथा बाळासाहेब माने यांनी त्यांचा व्यस्त कार्यक्रम असल्याने संस्थेला शुभेच्या दिल्या. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. Business guidance camp held in Guhagar

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पून करण्यात आली. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्प व भेट वस्तू देवून स्वागत करण्यात आले. प्रास्तविक मध्ये संस्थेचे उपाध्याक्ष श्री. प्रकाश अनगुडे यांनी संस्थेची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून गेली 21 वर्षे केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा सांगितला. तसेच संस्था कार्यवाढीसाठी असणाऱ्या आवश्यक गरजा मांडल्या. या संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जात आहेत. असे सांगितले. Business guidance camp held in Guhagar

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मा.अरुण फाटक सर यांनी प्रथम संस्थेचे कौतुक केले . गेली 21 वर्षे सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी कार्य करणारी रत्नागिरी जिल्हातील एकमेव संस्था आहे. त्यांनी उपस्थित दिव्यांगांना कागदापासून वेगवेगळ्या उपयुक्त वस्तू तयार करून दाखविल्या. त्यामध्ये कागदी पिशवी, शोभेच्या वस्तू, कागदाच्या लगदयापासून अनेक प्रकारची फळे, पक्षी, खेळांचे साहित्य इत्यादी वस्तू प्रात्याशिकासह बनवून दाखवून यांची विक्री कशी करावी. याबाबतची सखोल माहिती दिली. सदरची माहिती मा. गजानन रजपूत सर यांनी मूक बधीर – कर्णबधीर दिव्यांगांसाठी त्यांच्या भाषेत करून दाखविले. Business guidance camp held in Guhagar
यावेळी सल्लागार मा.अरुण मुळे सर, मा.विनायक ओक सर प्रकाश बापट यांनी उपस्थित दिव्यांगांना मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी जिल्हयातील एकूण 48 दिव्यांगांनी सहभाग नोंदविला. शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री.उदय रावणंग सर यांनी सर्व सहभागी दिव्यांगांनी जास्तीत जास्त वस्तू तयार करून संस्थेत विक्रीसाठी दिल्यास त्यांची विक्री करून दिली जाईल असे सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. Business guidance camp held in Guhagar

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.पुनम रावणंग, श्री.प्रवीण मोहिते, सौ. सानिका रांजणे, संगम रावणंग, कोमल शिंदे, श्री अनिल कुंभार, अनिल जोशी आदींनी विशेष प्रयत्न केले. संस्था करीत असलेल्या अशा प्रकाच्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. Business guidance camp held in Guhagar
