• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील ७ गावांना पाणी टंचाई

by Ganesh Dhanawade
April 25, 2023
in Guhagar
178 2
0
Villages in Guhagar have shortage of water
350
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टँकरची शोधाशोध; पंचायत समिती कडून तहसीलदारांकडे टँकरची मागणी

गुहागर, ता. 25 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात एप्रिलच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची झळ पोहचू लागली आहे. यामुळे तालुक्यातील ७ गावांना पाणी टंचाई जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली आहे. तीन गावांमध्ये यातील ग्रामपंचायतीमार्फत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. Villages in Guhagar have shortage of water

Villages in Guhagar have shortage of water

तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये ८ गावांमधील ८ वाड्यांना यावर्षी पाणी टंचाई जाणवेल, असे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये आंबेरे खुर्द, झोंबडी, काताळे, धोपावे, पाचेरीसडा आणि गोळेवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात आराखड्यामधील धोपावे गावाने टँकरची मागणी केली आहे, परंतु या आराखड्याबाहेरील ६ गावांमध्ये जानेवारी पासूनच टंचाई जाणवत आहे. यामुळे आराखड्यामधील गावे धरून यावर्षी टंचाईग्रस्त मोठ्याप्रमाणात गावांमध्ये वाढ होणार आहे. Villages in Guhagar have shortage of water

वेलदूर व रानवी या दोन गावांत जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर ग्रामपंचायतींनीच ग्रामनिधीतून आपल्या गावातील वाड्यांना एक दिवस आड टँकरने पाणी पुरवठा केला. त्यानंतर अंजनवेल गावातील कातळवाडी व सुतारवाडीला टंचाई जाणवू लागली आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या १९ तारखेपासून आरजीपीपीएलने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. वेलदूर व रानवीलाही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. धोपावे तेटले येथील ५० कुटुंबातील २०० लोकांना तर साखरीत्रिशुळ गवळवाडीमधील ३९ कुटुंबातील १५० लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सडेजांभारी येथील ४० कुटुंबे व तेथील शाळेसाठी टँकरची मागणी गेली आहे, तर कोसबीवाडी येथील सुवरेवाडीमधील ११० कुटुंबातील ४०० लोकसंख्येला पाणी टंचाई जाणवू लागली असून येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरची मागणी करण्यात आली आहे. Villages in Guhagar have shortage of water

दरम्यान, यातील सुवरेवाडीमध्ये ३०० मिटर अंतरावर पाण्याची व्यवस्था असल्यामुळे केलेली मागणी चुकीची असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गावाला टँकरची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. तरीही ७ गावांना पाणी टंचाई भेडसावू लागली असल्याने त्यांनी टँकरची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावांची पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरची व्यवस्था अद्याप केलेली नाही. पंचायत समितीने तहसीलदारांकडे टँकरची मागणी केली, असून सध्या टँकरची शोधाशोध सुरू आहे. Villages in Guhagar have shortage of water

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVillages in Guhagar have shortage of waterगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share140SendTweet88
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.