• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बोटीतून शेळामेंढ्यांची तस्करी

by Mayuresh Patnakar
April 25, 2023
in Ratnagiri
132 1
1
Smuggling of goats and sheep by boat
259
SHARES
740
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सीमाशुल्क विभागाने केली कारवाई

गुहागर, ता. 25 : बाणकोट, ता. मंडणगड किनारपट्टीपासून ७५ नॉटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून एक संशयास्पद बोट पकडण्यात आली. या शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बोटीवर शुक्रवारी दि. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली.  बोटीत ४ हजार शेळ्या मेंढ्या आढळल्या असून, याप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. ही बोट सिंधुदुर्गातून गुजरातकडे जात होती. Smuggling of goats and sheep by boat

शेळ्या, मेंढ्यांनी भरलेली बोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग जेट्टीवरून गुरुवारी सकाळी निघणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटीचा पाठलाग सुरू केला. मात्र, पाच तासानंतर ही बोट संपर्क कक्षेच्या बाहेर गेली. त्यानंतर अन्य एजन्सींना याबाबत माहिती देऊन बोटीचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर ही बोट बाणकोट किनारपट्टीपासून ७५ नॉटिकल मैल अंतरावर पकडण्यात आली. Smuggling of goats and sheep by boat

या बोटीची तपासणी केली असता बोटीत ४ हजार शेळ्या, मेंढ्या होत्या. या प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत होते. तस्करांनी बोटीची नोंदणी क्रमांक प्लेट बदलली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त अमित नायक यांनी सांगितले की, ही बोटी जयगड (ता. रत्नागिरी) बंदरात आणण्यात आली आहे. बोटीची योग्य चौकशी करण्यात येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले. Smuggling of goats and sheep by boat

Tags: goatGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarsheepSmuggling of goats and sheep by boatUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.