बाल विद्यार्थ्यांना आवाहन, गुहागर न्यूज करणार तुमच्या कामाचे कौतुक
गुहागर, ता. 24 : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान ४० ते ४५ अंशावर पोहोचत आहे. माणसाच्या अंगाची लाही लाही होत आहे. प्रचंड उष्णतेमुळे पशु-पक्षी, जनावरेही अडचणीत आले आहेत. त्यांचाही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी घराच्या परीसरात झाडाखाली पसरट भांड्यात पाणी भरुन ठेवा. असे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे. Keep water for animals and birds

उन्हाळ्यात पाणवठे सुकून जातात. वाढत्या तापमानामुळे सांडपाणी देखील जमिनीत चटकन जिरते किंवा वाफ होवून जाते. त्यामुळे पशु पक्षांना पाणी मिळत नाही. तहानेने व्याकुळ झालेल्या मुक्या जीवांचे हाल होतात. अशावेळी आपण आपल्या घराच्या परिसरात, गृह संकुलातील मोकळ्या जागेत, गच्चीवर, पसरट भांड्यात पाणी ठेवले तर पक्ष्यांना ते पाणी सहज पिता येईल. याचा दुसरा फायदा आपल्याला विविध पक्ष्यांचे निरीक्षण जवळून करता येईल. Keep water for animals and birds

कोकणातील अनेक गावात, शहरात शहाळ्यांचे पाणी प्यायले जाते. पाणी पिऊन झाल्यावर ही शहाळी दोन भाग करुन त्यात पाणी भरुन ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर आपण घरी गव्हाची चपाती, तांदळाच्या भाकऱ्या करतो. त्यातील उरलेल्या पीठाच्या गोळ्या करुन त्या पाण्याच्या भांड्याशेजारी ठेवल्यास पक्षांना खाद्य ही मिळेल. Keep water for animals and birds

शालेय विद्यार्थ्यांसाठी आवाहन
आता शाळेला सुट्टी लागली आहे. आपण आपल्या आजुबाजुच्या परिसरात पक्षांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था करा. आणि त्याचा फोटो तुमच्या नाव, गावासह गुहागर न्यूजला (whatsapp no. 9423048230 ) पाठवा. आपल्या चांगल्या कामाची माहिती प्रसिद्ध करु. चला तर मग बालमित्रांनो आपण आपल्या घर, सोसायटीच्या परिसरात पशुपक्ष्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करुया आणि पर्यावरण मित्र बनुया. Keep water for animals and birds
