• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

यावर्षी लाल मिरचीच्या दरात वाढ

by Ganesh Dhanawade
April 24, 2023
in Maharashtra
92 1
0
Increase in chilli price
181
SHARES
517
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मिरचीच्या वाढत्या भावाने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले

गुहागर, ता. 24 : मिरचीचा भाव वाढल्याने वर्षभर पुरेल इतका मसाला करण्याची सवय असलेल्या गृहिणींना यावर्षीचा मसाला चांगलाच झोंबला आहे. मिरचीचे भाव गगनाला भिडल्याने मसाला करण्यासाठी करावयाच्या आर्थिक बजेटचे गणित जुळवताना महिलांना चांगलीच दमछाक करावी लागली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मिरचीचे भाव किलोमागे २५० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत झाल्याने मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची तिखट झाल्याची प्रतिक्रिया गृहिणीकडून व्यक्त केली आहे. Increase in chilli price

खवय्यांना चटकदार खाण्यासाठी जेवणात लागणारी मसाल्यासाठीची लाल मिरचीचे २० पेक्षा अधिक प्रकार ग्राहकांना पाहायला मिळतात. चवीसाठी लागणाऱ्या बेडगी मिरचीला ग्राहकांकडून मागणी असते. यावेळी मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव २५० रुपयांपासून ७०० रुपये किलोपर्यंत असल्याने यावर्षी मसालाही कमी प्रमाणात करण्यात आल्याचे गृहिणीमधून बोलले जात आहे. लाल मिरची विकत घेऊन मसाला केल्यानंतर हा मसाला गृहिणी वर्षभर पुरवितात लग्न सराईत घरचा मसाला असेल तर जेवणाला वेगळी चव असते. घरात बनविलेल्या मसाल्यामुळे खर्च कमी होत असला तरी यावेळी मात्र मिरचीचे भाव वाढल्याने खर्च ही वाढल्याचे महिलांचे म्हणणे आहे. Increase in chilli price

महागाई दिवसेंदिवस वाढत असून मसाल्यासाठी मिरचीला अधिक मागणी असल्याने मिरचीचे भाव वाढले आहेत. बाजारात विविध कंपन्यांचे मसाले उपलब्ध असले तरी घरच्या मसाल्याला वेगळी चव असल्याने गृहिणींचा मेहनत घेऊन मसाला करण्याकडे अधिक कल असतो. Increase in chilli price

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIncrease in chilli priceLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.