• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माहिती अधिकार महासंघ गुहागर अध्यक्षपदी सुनील पवार

by Ganesh Dhanawade
April 24, 2023
in Guhagar
121 1
0
Information Rights Activist Federation Selection
238
SHARES
679
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सचिवपदी आशिष कारेकर, महिलाध्यक्षपदी समृद्धी गुहागरकर

गुहागर, ता. 24 : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र गुहागरच्या अध्यक्षपदी सुनील पवार तर सचिवपदी आशिष कारेकर यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. सहयाद्री शिक्षण संस्था सावर्डे येथील सभागृहात पार पडलेल्या फेडरेशनच्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, सचिव समीर शिरवाडकर जिल्हाध्यक्ष सुशांत मराठे, जिल्हा सचिव पद्ममनाभ कोठारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. Information Rights Activist Federation Selection

Information Rights Activist Federation Selection

सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे तसेच गुहागरचे माजी सभापती सुनील पवार यांच्या एकुणच कामकाजाची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपण आपल्यावर दिलेली ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू तसेच सर्वांना सोबत घेऊन संघटनेचा विस्तार गुहागर तालुक्यात अधिकाधिक प्रमाणात करू, अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. Information Rights Activist Federation Selection

Information Rights Activist Federation Selection
Sunil_Pawar

या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी गणेश कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी मनोज पाटील, सहसचिवपदी महेश जाधव, मुख्य संपर्कप्रमुखपदी अक्षय पवार, प्रचारप्रमुखपदी किरण अवेरे, मुख्य संघटकपदी मनेष चव्हाण यांची निवडदेखील जाहीर करण्यात आली. तसेच यामध्ये महिला कार्यकारणी देखील घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलाध्यक्षपदी समृद्धी गुहागरकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सिद्धी सावंत, कार्याध्यक्षपदी माधवी पाटील, सचिवपदी शुभांगी सोनटक्के, सहसचिवपदी कस्तुरी खैर, मुख्य संपर्कप्रमुखपदी सिद्धी चव्हाण, प्रचारप्रमुखपदी सिद्धी जाधव, मुख्य संघटकपदी कल्पना वणे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सुनील पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Information Rights Activist Federation Selection

Tags: Federation of Right to InformationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInformation Rights Activist Federation SelectionLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.