• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली नं. 2 शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा

by Ganesh Dhanawade
April 24, 2023
in Guhagar
94 1
0
Amrit Mahotsav Celebration of Talvali School

जि.प. शाळा तळवली नं. २

186
SHARES
530
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २५ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तळवली भडकंबावाडी, मुंढर – शिरबारवाडी व चाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवली नं. २ या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या अमृतमहोत्सवी सोहळ्या निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Amrit Mahotsav Celebration of Talvali School

या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि. २५ रोजी सकाळी ८ वा. शोभायात्रा, सकाळी ९ वा. अल्पोपहार, सकाळी १० वा. माजी विद्यार्थी मेळावा व मान्यवरांचा सत्कार दुपारी १ वा. स्नेहभोजन, दुपारी ३ वा. रक्तदान शिबीर, सायं.५ वा. फनी गेम्स, साय. ६ वा हळदीकुंकू समारंभ, रात्री ९ वा. जि. प. प्राथमिक शाळा तळवली नं.२ चे आजी माजी विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गुहागरच्या तहसिलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, विस्तार अधिकारी रायचंद्र गळवे, केंद्रीय प्रमुख सुभाष पवार, तळवली सरपंच मयुरी शिगवण, मुंढर कातकीरी सरपंच सुशील आग्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Amrit Mahotsav Celebration of Talvali School

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अमृत महोत्सव कमिटी अध्यक्ष प्रमोद गांधी, उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे, सचिव अमोल जड्याळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद कळंबाटे, मुख्याध्यापिका सुजाता मोदी, जि.प. शाळा तळवली नं. २ व अंगणवाडी चे सर्व शिक्षकवृंद यांनी केले आहे. Amrit Mahotsav Celebration of Talvali School

Tags: Amrit Mahotsav Celebration of Talvali SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.