• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज मागणी

by Guhagar News
April 22, 2023
in Ratnagiri
75 1
0
Online Application for Best Village Nomination
148
SHARES
423
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अंतिम मुदत दि. 05 मे 2023 पर्यंत; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा अनेक नररत्नांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेला आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या जिल्ह्याला निसर्गानेही भरभरून दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर UNWTO (United Nation World Tourism Organisation) a Best Tourism Village Competition नामांकनासाठी  संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या नामांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 05 मे 2023 पर्यंत आहे. Online Application for Best Village Nomination

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्वे व अर्ज भरण्याच्या पध्दती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही स्पर्धा जिल्हा, राज्य व केंद्र अशा स्तरांवर होणार आहे. “उत्कृष्ट  पर्यटन गाव” (Best Tourism Village Competition) नामांकनासाठी अर्ज करण्यासाठी नोंदणी आवश्यक असून त्यानंतर विहीत नमुन्यातील अर्ज, नामांकनाविषयक बाबींचे परिपूर्ण फोटो, विस्तृत माहितीसह, pdf स्वरुपातील सर्व माहिती इंग्रजी भाषेमध्ये भरावयाची आहे. Online Application for Best Village Nomination

त्यामध्ये  पर्यटन खेड्यांची थोडक्यात परिपूर्ण माहिती (write-up only in English with required doccuments) सोबतच्या माहितीपत्रकातील सूचनांचे परिपूर्ण वाचन करुन संबंधित खेड्यांमध्ये पर्यटन विकासाला असणारा वाव, पर्यटनविषयक मूलभूत सोयी सुविधा, जिल्ह्याच्या पर्यटन विकासातील योगदान, भविष्यातील पर्यटन विकास योजनांचा आराखडा इ. माहिती संकेतस्थळावर pdf स्वरुपात (2 एमबी मर्यादेत) भरताना आवश्यक ठिकाणी संकेतस्थळावर checkbox मध्ये योग्य ठिकाणी टिक करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Online Application for Best Village Nomination

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOnline Application for Best Village NominationUnited Nation World Tourism OrganisationUNWTOUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.