• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

by Guhagar News
April 18, 2023
in Guhagar
104 1
0
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Chikhli
204
SHARES
583
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर तालुका वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गुहागर, ता. 18 : बौद्धजन सहकारी संघ मौजे चिखली येथे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर (Human Rights Association for Protection Guhagar) तालुका वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Chikhli

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद गमरे यांनी भूषवले तर मनोज गमरे यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमामध्ये ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (Human Rights Association for Protection Guhagar) संस्थेविषयी माहिती संदीपजी मांडवकर यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशी साजरी केली पाहिजे व त्यांचे बहुजन समाजाविषयी कार्य, कार्याध्यक्ष व होमगार्ड समुपदेशक श्री. सुधाकर शामराव कांबळे यांनी समजावून सांगितले. संस्थेचे अध्यक्ष adv सुशील गणपत अवेरे यांनी संस्थेचे कार्य समजावून सांगताना गुहागर तालुक्यातील बहुजन समाजाला सोबत घेऊन गुहागर तालुक्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास करतांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श घेऊनच व गौतम बौद्ध यांच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे काम करणार. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून आपला शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Chikhli

यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष  adv सुशील गणपत अवेरे, उपाध्यक्ष श्री. अरुण महादेव मालप, कार्याध्यक्ष व होमगार्ड समुपदेशक श्री. सुधाकर शामराव कांबळे, सचिव श्री.अमरनाथ विष्णू मोहिते, कोषाध्यक्ष व जामसूद  गावचे सरपंच श्री. महेश यशवंत जामसुतकर, तसेच संस्थेचे विशेष सल्लगार व चिखली गावचे सुपुत्र तंटा मुक्ती अध्यक्ष संदीपजी मांडवकर साहेब उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्धजन सहकारी संघ मौजे चिखली येथील बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Chikhli 

Tags: Dr. Babasaheb AmbedkarDr. Babasaheb Ambedkar Jayanti at ChikhliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHuman Rights Association for Protection GuhagarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.