• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सैन्यात अग्निवीरसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षेला सुरुवात

by Guhagar News
April 18, 2023
in Bharat
114 2
0
Online Entrance Test for Firefighters in Army Starts
225
SHARES
642
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : भारतीय सैन्यदलाने अग्निवीर, ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि इतर श्रेणींसाठी भर्ती प्रक्रियेत संगणक आधारित ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा सुरू करून परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. पात्र नोंदणीकृत  उमेदवारांची  ऑनलाईन सी ई ई परीक्षा देशभरातील 176 ठिकाणी 375 परीक्षा केंद्रांवर 17 एप्रिल 2023 पासून सुरु झाली असून ती  26 एप्रिल 2023 पर्यंत चालेल. Online Entrance Test for Firefighters in Army Starts

ही ऑनलाईन परीक्षा शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एज्युकेशन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या मिनी रत्न कंपनीच्या सहयोगाने घेतली जात आहे. देशातील युवकांच्या तांत्रिक ज्ञानात लक्षणीय प्रगती झाली असून  नेटवर्कच्या अत्यंत सुधारलेल्या संपर्क जाळ्यामुळे आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे, देशातील युवक आता लांब अंतराचा प्रवास करून प्रत्यक्ष स्वरूपात परीक्षा देण्याऐवजी ऑनलाईन परीक्षा देण्याच्या दृष्टीने सक्षम झाला आहे. परीक्षा पद्धतीमधील या बदलामुळे निवड प्रक्रियेत आकलनविषयक दृष्टिकोनावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होण्याची शक्यता रोखली जाईल. याशिवाय देशभरात व्यापक प्रमाणात परीक्षा घेता येतील आणि भर्ती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या मेळ्यात होणारी गर्दी टाळता येईल, त्यामुळे ही परीक्षा घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सुलभ होईल. नवीन भरती प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल. Online Entrance Test for Firefighters in Army Starts

पहिल्या टप्प्यात, www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि आवेदन केलेले उमेदवार ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षेला बसतील. दुसऱ्या टप्प्यात, निवड झालेल्या उमेदवारांना जून 2023 पासून भर्ती  मेळाव्यासाठी संबंधित सैन्य भरती कार्यालयाने ठरवलेल्या ठिकाणी  भर्ती रॅलीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावले जाईल. या टप्प्यात, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. Online Entrance Test for Firefighters in Army Starts

सुधारित भर्ती प्रणालीमुळे भर्ती प्रक्रिया अधिक सुटसुटीत, पारदर्शक होईल आणि  तिची रचना माहिती तंत्रज्ञानातील देशात उपलब्ध असलेल्या अद्ययावत पायाभूत सुविधांचा लाभ उत्तम प्रकारे करून घेण्याच्या दृष्टीने केलेली असेल. Online Entrance Test for Firefighters in Army Starts

Tags: Education Consultancy Services India LimitedfirefightersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndian ArmyLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOnline Entrance TestOnline Entrance Test for Firefighters in Army StartssmartphoneUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.