• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दुबईत इमारतीच्या भीषण आगीत ४ भारतीयांचा मृत्यू

by Guhagar News
April 17, 2023
in Bharat
123 1
0
4 Indians killed in massive fire in Dubai
241
SHARES
688
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : दुबई येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील वेंगारामध्ये राहणारे 38 वर्षीय रिजेश आणि त्यांची 32 वर्षीय पत्नी जिशी, तसेच तामिळनाडूचे रहिवासी अब्दुल कादर आणि सलियाकुंड आहेत. 4 Indians killed in massive fire in Dubai

सरकारी-संलग्न वृत्तपत्र ‘द नॅशनल’ने दुबई मीडिया ऑफिसद्वारे प्रदान केलेल्या ‘दुबई सिव्हिल डिफेन्स’ च्या निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या आगीच्या घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. शनिवारी दुबईच्या अल रास भागात आग लागली. येथे दुबईचे मसाले बाजार भरते, जे दुबई खाडीजवळ पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे. 4 Indians killed in massive fire in Dubai

आगीची माहिती मिळताच पोर्ट सैद अग्निशमन केंद्र आणि हमरिया अग्निशमन केंद्राचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. पहाटे अडीचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. दुबईत राहणारे भारतीय नसीर वतनपल्ली यांनी सांगितले की, मृतांमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे. ज्यामध्ये केरळचे जोडपे आणि अन्य दोघे तामिळनाडूचे आहेत. या अपघातात पाकिस्तानातील तीन चुलत भाऊ आणि नायजेरियन महिलेचाही मृत्यू झाला. भारतीय दूतावासाच्या मदतीने मृतदेह भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 4 Indians killed in massive fire in Dubai

Tags: 4 Indians killed in massive fire in DubaiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.