• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाख

by Guhagar News
April 14, 2023
in Ratnagiri
66 1
0
25 lakhs to the taluk from cleanliness campaign
130
SHARES
371
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता अभियानातून तरतूद; नऊपैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर

गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यात तयार प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला २५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नऊपैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर मिळाली असून मे अखेरपर्यंत प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे. 25 lakhs to the taluk from cleanliness campaign

प्लास्टिक बाटल्यांसह पिशव्या जागोजागी टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्यात प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी जागा निश्‍चित झाल्या असून कचरा संकलित करून तेथे आणला जाणार आहे. हा प्रकल्प सुरू ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपवली आहे. 25 lakhs to the taluk from cleanliness campaign

यामधून ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळणार आहे. प्रत्येक तालुक्याला २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या कामांना जिल्हा प्रशासनाकडून वर्कऑर्डर मिळाल्याने प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसात सुरू होईल. प्रक्रिया प्रकल्प मे अखेरपर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. एका प्रकल्पात ३ मशिन, २ शेड आणि १ प्लास्टिक वर्गीकरणासाठी १ वेगळी शेड उभारली जाणार आहे. कचरा स्वच्छ करणे, प्लास्टिक बारीक करणे, बारीक कचरा एकत्रित करणे यासाठीची ३ मशिन असतील. यामध्ये दररोज एक टनापर्यंतचा कचरा प्रक्रिया करण्यात येणार आहे. 25 lakhs to the taluk from cleanliness campaign

Tags: 25 lakhs to the taluk from cleanliness campaignGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.