तहसिलदार कार्यालयासमोर; बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत
गुहागर, ता. 26 : वरवेली बौध्दवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत न्याय मिळण्यासाठी सोमवार दि. 01 मे 2023 रोजी साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. सदरचे उपोषण हे तहसिलदार कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. Chain hunger strike in front of Tehsildar office

निवेदनात असे म्हटले आहे की, वरवेली बौध्दवस्तीतून मराठवाडीकडे जाणारा सुमारे 600 मीटर लांबीचा रस्ता गेली दोन वर्षे नादुरुस्त झालेला आहे. सदर रस्त्याची गटार लाईन बुझल्यामुळे पावसाचे पाणी आजुबाजुच्या घरात शिरते. तसेच रस्यावरील चिखलातून चालणे अवघड होते. याच रस्त्याने आरोग्य उपकेंद्रात, रेशन दुकानात, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात, वि.वि. सहकारी सोसायटीत, पोस्ट ऑफिसात वारंवार जाणे-येणे करावे लागते. Chain hunger strike in front of Tehsildar office
तरी या मुख्य रहदारीच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासन (ग्रामपंचायत) यांचे पर्यंत विषय पोहोचवून सुद्धा ते दुर्लक्ष करत असल्याने वरवेली बौध्दवाडीतील सर्व पुरुष व महिला तहसिलदार कार्यालयासमोर सोमवार दि. 01 मे 2023 रोजी साखळी उपोषणाला बसणार आहेत. Chain hunger strike in front of Tehsildar office
