• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये रंगणार पालखी नृत्य स्पर्धा

by Mayuresh Patnakar
April 13, 2023
in Guhagar
156 2
0
Palkhi Dance Competition in Guhagar
307
SHARES
876
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पत्रकार संघाच्या पुरस्काराचेही होणार वितरण

गुहागर, ता. 13 : गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर प्रथमच पालखी नृत्य स्पर्धा रंगणार आहे. गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी पत्रकार संघाच्या दोन पुरस्काराचे वितरण होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी दिली. Palkhi Dance Competition in Guhagar

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवानंतर पालखी नृत्य स्पर्धा भरविल्या जातात. गुहागर तालुक्यात याच कालावधीत पालखीचा डोलारा लोटण्याचे कार्यक्रम होतात.  त्यामुळे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन आजपर्यंत झालेले नाही. मात्र गुहागर तालुक्यातील काही गावांतील तरुणांनी पालखी नृत्य शिकुन आपले संघ तयार केले आहेत. आता पालखी नृत्याविषयी तालुकावासीयांमध्ये आकर्षण आहे. हे लक्षात घेवून गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रीत संघाच्या पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये तनाळी व शिरवली हे चिपळूण तालुक्यातील दोन संघ सहभागी होणार आहेत. तर मळण, पालपेणे आणि वरवेली हे गुहागर तालुक्यातील तीन संघ सहभागी होणार आहेत. Palkhi Dance Competition in Guhagar

शनिवार, 15 एप्रिल रोजी ही स्पर्धा गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानावर आयोजीत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. मंत्र्याच्या उपस्थित गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दोन पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी दिली. या कार्यक्रमाला गुहागर तालुकावासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे. Palkhi Dance Competition in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuhagar Taluka Journalist AssociationLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPalkhi Dance Competition in GuhagarUpdates of Guhagarगुहागर तालुका पत्रकार संघगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.