• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मढाल येथे प्रिमियर लिगचे आयोजन

by Ganesh Dhanawade
April 12, 2023
in Guhagar
172 2
0
Premier League organized at Madhal
337
SHARES
964
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.12 : तालुक्यामध्ये तयार होत असणा-या नवनवीन खेळाडुंना संधी देण्याचे काम विविध संघटनांकडुन वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातुन सुरु आहे. यामध्ये गुहागर चिपळुण सिमेवरील मढाळ गावही अग्रेसर आहे. यावर्षी मढाळ प्रिमियर लिग २०२३ चे भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन पहिले पर्व सुरु करण्यात येत आहे. दि.३० एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत काळेश्री ग्राऊंड तळा कारकर वाडी मढाळ येथे या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेचा क्रिडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मढाळ प्रिमियर लिगचे आयोजक अध्यक्ष अमर यांनी केले आहे. Premier League organized at Madhal

या दोन दिवस चालणा-या स्पर्धेमध्ये विविध आकर्षक पारितोषिकांसह अनेक गौरव चषक ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रु. २५,५५५/- रोख व चषक, द्वितीय क्रमांक रु.१५,५५५/- रोख व चषक, तृतीय क्रमांक रु.९,९९९/- व चषक तर चौथ्या क्रमांकास रु.६,६६६/- रोख व चषक तर याव्यतिरीक्त मालिकाविर, सामनाविर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासह लक्षवेदी खेळाडुचाही सन्मान करण्यात येणार आहे. Premier League organized at Madhal

संघमालक म्हणुन एकुण आठ जणांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे या स्पर्धेची रंगत वाढली आहे. यात मनस्वी फायटर संघ, विष्णु गोविंद मोरे , शिवांश सोल्जर संघ, संतोष चव्हाण व निलेश चव्हाण, शिव स्टायकर्स संघ सदाशिव (आप्पा) सोलकर, क्षत्रिय कुलावतंश प्रतिष्ठान राम भाई सोलकर, सन रायझर्स ,परेश सुर्वे व साहील शिर्के, अनिष इलेव्हन प्रदिप सोलकर, (आंभिरा) आंबेडकर भिमराव रामजी स्पोर्ट्स श्रृती जाधव व पल्लवी सकपाळ तसेच काळेश्वरी नाईट रायडर्स चंद्रकांत पागडे यांनी संघांचे मालकत्व घेतले आहे. स्पर्धा आयोजन, नियोजन व यशस्वीतेकरीता तमाम मढाळ वासिय व मढाळ प्रिमियर लिग कमिटी प्रयत्नशिल आहे. Premier League organized at Madhal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPremier League organized at MadhalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share135SendTweet84
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.