अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या वतीने अंजनवेल येथील आदर्श व्यक्तीमत्व माजी सरपंच यशवंत सोनू बाईत यांचा नुकताच गौरव करण्यात आला. त्यांना केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. Glory to former Sarpanch Yashwant Bait
अंजनवेल कातळवाडी येथील ग्रामदेवता श्री उत्राज काळेश्वरी सहाण येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी सरपंच यशवंत बाईत यांना सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा व अन्य संस्था यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला होता. हा पुरस्कार भारत सरकारच्या केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराची दखल घेऊन अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. Glory to former Sarpanch Yashwant Bait

या कार्यक्रमासाठी माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, माजी जि.प. सदस्या स्मिता धामणस्कर, माजी उपसरपंच आत्माराम मोरे, नवनाथ कुरधुडकर, अजित मस्तान गावपाटील दत्ताराम भुवड, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्रीपत देवाळे, बोरभाटले वाडी प्रमुख गंगाराम भुवड, ग्रा.प. सदस्या वेदिका भुवड, दिक्षा देवाळे, अनिल खडपेकर, भाऊ मिशाल, उमेश किल्लेकर, रमेश निवाते, दत्ताराम पड्याल, जयराज भुवड, सुरेश देवाळे, राऊतरावसर, बाबासाहेब राशिनकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग बने यांनी केले तर सुत्रसंचालन दिपेश भुवड व संतोष गुळेकर यांनी केले. आभार रविंद्र भुवड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजनवेल, बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ युवक यांनी सहकार्य केले. Glory to former Sarpanch Yashwant Bait
