• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असणार

by Guhagar News
April 11, 2023
in Bharat
254 3
0
Monsoon this year is below average
499
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज

दिल्ली, ता. 11 : यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४ टक्के असणार आहे. यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. Monsoon this year is below average

एल निनोच्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले, ट्रिपल-डिप-ला निनामुळे गेल्या सलग चार वर्षांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा राहिलं. आता ला निना संपला आहे आणि एल निनोची शक्यता वाढत असून पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. Monsoon this year is below average

स्कायमेटनुसार, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनमध्ये अपुरा पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल. संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा थेट परिणाम होतो. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो. Monsoon this year is below average

मराठी विज्ञान परिषदेच्या अदिती जोगळेकर यांच्या मते, १६ व्या शतकात दक्षिण अमेरिकी मासेमारांना प्रशांत महासागराचे पाणी अचानक नेहमीपेक्षा उबदार होत असल्याचे आढळले. सहसा नाताळाच्या सुमारास हा बदल दिसल्याने त्यांनी ‘एल निनो’ असे नाव दिले. सामान्यत: पश्चिम-प्रशांत महासागरातील पाणी उबदार असल्यामुळे आग्नेय आशियाच्या किनाऱ्यालगत हवेचा दाब कमी असतो. याविरुद्ध पूर्व-प्रशांत महासागरात दक्षिण अमेरिकेलगत पाण्यावर हवेचा उच्च दाब असतो. हवेच्या दाबातील फरकाने वारे आणि त्यासोबत बाष्प पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते त्यामुळे आग्नेय आशियासह भारतीय उपखंडात पाऊस पडतो. एका वर्षीच्या उन्हाळय़ामध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील १२-१८ महिने टिकू शकते. त्याची तीव्रता तापमानावर ठरते. ४ ते ५ अंश फॅरेनहाईट तापमानवाढ झाल्यास सौम्य, पण १४ ते १८ अंश फॅरेनहाईटने तापमानवाढ झाल्यास सर्वदूर परिणाम दिसतात. Monsoon this year is below average

दर दोन ते सात वर्षांनी ‘एल निनो’ परिणाम घडतो. पूर्वप्रशांत महासागरातील पेरू, इक्वाडोरच्या किनाऱ्यालगत नेहमीपेक्षा प्रबळ उष्ण प्रवाह तयार झाल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. या उलट पश्चिमेला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागरावर उच्चदाब निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागराकडून बाष्पभारित वारे पूर्वेकडे वाहतात. याचा परिणाम म्हणून दक्षिण अमेरिकेत अतिवृष्टी, तर आग्नेय आशियामध्ये अवर्षणाची स्थिती निर्माण होते. एल निनो सक्रिय झाल्यास व्यापारी वारे कमजोर होतात. सागरी प्रवाह व समुद्रपातळीत बदल घडतात. Monsoon this year is below average

एल निनो प्रबळ असलेल्या वर्षी अटलांटिक महासागरातील चक्रीवादळे कमी होतात. परंतु भारतीय उपखंडातील बऱ्याच देशांमध्ये दुष्काळ पडतो. भारतात गेल्या ५० वर्षांत पडलेले १३ पैकी १० दुष्काळ एल निनोशी निगडित आहेत. ‘ला निनाचा’ प्रभाव याच्या उलट असतो. उष्णकटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड झाल्यावर ला-निना प्रभावी होतो. ‘ला निना’ वर्षांत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. तसेच तीव्र व्यापारी वारे व सागरी प्रवाहांमुळे थंड व पोषक पाणी पृष्ठभागावर येऊन प्लवक व माशांची पैदास वाढते. एल निनो व ला निना या दोन प्रभावांचा संपूर्ण जगाचे जल-वायुमान ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. Monsoon this year is below average

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMonsoon this year is below averageNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share200SendTweet125
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.