गुहागर, ता.10 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन दिले. जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे, असे चित्र पहावयास मिळते. नुकतेच भातगाव गोळेवाडी येथील ग्रामस्थांनी एकमताने पालकमंत्री सामंत साहेब व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा ठराव करत आश्वासन दिले. Bhatgaon Golewadi villagers support Shiv Sena
गुहागर शिवसेना तालुका प्रमुख दिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत भातगाव गोळेवाडी ग्रामस्थांनी बैठक घेवुन आपल्या गेल्या बारा वर्षापासुनच्या विकासकामांच्या व्यथा मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने अवघ्या दिड किमी लांबीच्या रस्त्याला खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी भेटी घेवुन निवेदने दिली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या रस्त्याच्या कामाचे आश्वासन दिले जात होते परंतु काम काही तब्बल बारा वर्षे होवुनही झाले नाही. एकंदर एकविसाव्या शतकात देश जात असतांना भातगाव गोळेवाडी ग्रामस्थांना मात्र स्वातंत्र्यपुर्व काळाप्रमाणे वागणुक मिळत आहे. यामध्ये बदल व्हावा आणि तो शिवसेना पक्ष व पालकमंत्री सामंतच करु शकतात. असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी पाठींबा दर्शविला आहे. Bhatgaon Golewadi villagers support Shiv Sena
या रस्त्यामुळे येथील लोकांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्ण वा गरोदर महिलांना दवाखान्यात जाण्याकरता हाल अपेष्ठांना सामोरे जावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांनाही दिड किमी अंतर पुर्ण डोंगर चढुन जावे लागते आहे. याचबरोबर प्राथमिक मराठी शाळेची इमारतीचा स्लॅब गळत असल्याने विद्यार्थी शाळेत बसविता येत नाहीत त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर पाण्यासाठी सुध्दा दगदग होत आहे. Bhatgaon Golewadi villagers support Shiv Sena
या पाठींब्याबाबत मत व्यक्त करतांना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी त्यांचा विश्वास सार्थक करत रस्त्याचे व शाळा दुरुस्तीचे काम लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातुन पुर्ण करु असे आश्वासन दिले. कामाची चिंता करु नका आम्ही विकासकामांसाठीच प्रयत्नशील आहोत असे सांगितले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुखांसह तालुका सचिव संतोष आग्रे, उपतालुका प्रमुख व मुंढर सरपंच सुशिल आग्रे, उपतालुकाप्रमुख व जामसुत सरपंच महेश जामसुतकर यांनी मार्गदर्शन केले. Bhatgaon Golewadi villagers support Shiv Sena
या भेटीवेळी तालुकाप्रमुखांसह युवा तालुका प्रमुथ रोहन भोसले, उपतालुका प्रमुख भाऊ काजरोलकर, विभाग प्रमुख व कोळवली सरपंच संतोष सावरकर, संदेश कचरेकर व जय काजरोलळकर तसेच यावेळी गावातील श्री शंकर यशवंत ठोंबरे, श्री विनायक शंकर ठोबंरे, श्री रमेश कृष्णा ठोंबरे, श्री रविंद्र शांताराम ठोंबरे, श्री विठ्ठल देवका दुर्गवली, श्री सुभाष सुरेश मते, श्री संतोष मालू भुवड, श्री अनंत महादेव दुर्गवली, श्री समीर पुरोषत्तोम रानडे आदींसह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. Bhatgaon Golewadi villagers support Shiv Sena