निरामय जीवनासाठी योग प्राणायाम फायदेशीर; अनुराधा दामले
गुहागर, ता.10 : दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पालशेत नं. १ आदर्श प्रशालेत प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी व आरोग्य उपकेंद्र पालशेत यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. Yoga camp completed in Palshet school

यावेळी विद्यार्थ्यांना पतंजली योग पिठाच्या प्रशिक्षिका अनुराधा दामले यांनी योगसाधनेच महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक धडे दिले. निरामय जीवनासाठी योग प्राणायाम अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांनी या योग शिबिराचा लाभ घेतला. त्यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. बाबासाहेब राशिनकर यांनी तर आभार उपशिक्षक श्री संतोष गावडे यांनी मानले. Yoga camp completed in Palshet school

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दर्शना समगिस्कर, आरोग्य सेविका श्रीम. अंकिता पालकर, मदतनीस श्रीम. विजया नाटेकर, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. विनायक साबळे, आशा सेविका सौ.वृंदा विखारे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अतिष चव्हाण उपाध्यक्ष सौ. प्रित पटेकर, सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व सर्व पालकांनी समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत. Yoga camp completed in Palshet school

