केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची उपस्थिती
गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी 7 मार्चला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल उपस्थित रहाणार आहेत. या दौऱ्यात प्रल्हादसिंग ओबीसी समाजाच्या जिल्हा समितीबरोबर चर्चा करणार आहेत. तर आढावा सभेनंतर भाजपच्या संघटनात्मक बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. Overview of Ratnagiri district in Guhagarat
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या केंद्रातील सर्व मंत्र्यांना स्वत:चे राज्य सोडून अन्य राज्यातील एका लोकसभा मतदारसंघाला भेट देण्याची योजना बनवली आहे. या योजनेअंतर्गत केंद्रीय फळ प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्याकडे रायगड लोकसभा मतदारसंघ देण्यात आला. गेले 5 महिने वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचा दौरा पुढे जात होता. अखेर 7 मार्चला प्रल्हादसिंह यांचा दौरा निश्चित झाला आहे. 6 मार्चला नेत्रावतीने ते रात्री चिपळूणला उतरणार आहेत. रात्री कापसाळ येथे संतोष मालप यांच्या निवासस्थानी एक बैठक आहे. Overview of Ratnagiri district in Guhagarat
शुक्रवार 7 मार्चला सकाळी 9 वाजता गुहागर येथे ओबिसी समाजाच्या जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर हॉटेल शांताई येथे रत्नागिरी जिल्ह्याची जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानासंदर्भातील बैठक होणार आहे. ही बैठक संपल्यावर श्रीपुजा सभागृह पाटपन्हाळे येथे गुहागर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बैठकीला ते मार्गदर्शन करतील. Overview of Ratnagiri district in Guhagarat
7 मार्चला दुपारी भोजनानंतर प्रल्हादसिंह पटेल व्याडेश्र्वर व दुर्गादेवी मंदिरात दर्शन घेतील. यावेळी दुर्गादेवी मंदिरात गुहागरमधील स्थानिकांबरोबर ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3.00 नंतर अंजनवेल कातळवाडी येथे जलजीवन मिशनबाबत ग्रामस्थांजवळ चर्चा असा कार्यक्रम आहे. Overview of Ratnagiri district in Guhagarat
7 मार्चला सायंकाळी 7.30 वा. दाभोळ येथील जलजीवन योजनेचे भुमिपूजन आणि धन्यवाद सभा होईल. 8 मार्चला दुपारपर्यंत प्रल्हादसिंग पटेल यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते महाडमार्गे पुणेकडे रवाना होतील. Overview of Ratnagiri district in Guhagarat