• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत चित्रपट रसस्वाद शिबिर

by Mayuresh Patnakar
April 6, 2023
in Ratnagiri
44 1
0
Film Camp in Ratnagiri
87
SHARES
249
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

फिल्म सोसायटी, फिल्म क्लबचे आयोजन

रत्नागिरी, ता. 06 रत्नागिरी फिल्म सोसायटी, गोगटे कॉलेज फिल्म क्लब आणि एस. बी. कीर लॉ कॉलेज फिल्म क्लबने  न्यू व्हिजन २०२३ हे दोन दिवसीय चित्रपट रसस्वाद शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर दि. 8 आणि 9 एप्रिल रोजी गोगटे कॉलेज (Gogate College) येथील ज. शं. केळकर सेमिनार हॉल, रत्नागिरी येथे घेण्यात येईल. Film Camp in Ratnagiri

मीडियाचे एक साधन म्हणजे सिनेसृष्टी होय. अख्खा मीडिया हे आजकाल शिक्षणाचे प्रभावी साधन आहे. चित्रपट हे आजकालचा समाज दाखवण्याचा आरसा होय. म्हणजे चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून चित्रपटाच्या साहाय्याने विविध समाज ,वर्ग  त्यांचे स्वरूप, चांगल्या आणि वाईट गोष्टी अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्या मनोरंजक पद्धतीने समाजापर्यंत पोहचविणारे साधन आहे. त्याच अनुषंगाने यातील विविध क्षेत्रातील करिअरकडे पहात असताना त्यासाठी नेमका चित्रपट कसा पहावयाचा, चित्रपटाचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत. यामध्ये दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी, चित्रपट आणि साहित्य या विषयी माहिती दिली जाणार आहे. Film Camp in Ratnagiri

त्यासाठी या क्षेत्रातले जाणकार  श्री सुहास किर्लोस्कर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या या विषयीच्या लेखमाला साप्ताहिक सकाळ तसेच महाराष्ट्र टाइम्स  मधून प्रदर्शित झालेल्या आहेत. चित्रपटातील विशिष्ट सीन हे का आणि कसे केले जातात. तसेच निवडक चित्रपटांचे रसग्रहण व चर्चा या कार्यशाळेद्वारे होणार आहे. तसेच ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असून इतरांना रू. 350 भरून नोंदणी करता येईल. ज्यांना या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी डॉ.नितीन चव्हाण -8975766608, डॉ.निधी पटवर्धन – 9421439664, सहाय्यक प्राध्यापिका सौ. संयोगिता सासने 9923293300 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Film Camp in Ratnagiri

Tags: Film Camp in RatnagiriGogate CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.