• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर जुदो-कराटे प्रशिक्षणाचा समारोप समारंभ

by Manoj Bavdhankar
April 5, 2023
in Guhagar
83 1
0
Conclusion of Guhagar Judo-Karate training
163
SHARES
466
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुलींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण आत्मसात करावे; प्रमोद केळस्कर 

गुहागर, ता. 05 : गुहागर सारख्या ग्रामीण भागात  फारमोठ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध नाहीत, मात्र येथील गुहागर हायस्कूल मध्ये जुदो – कराटे सारखे स्वसंरक्षणार्थ कलांचे ट्रेनिंग सेंटर पाहून समाधान वाटले,  कोकणासारख्या चांगल्या वातावरणातील भागात आपण राहात असलो तरी सर्वच मुलींनी जुदो – कराटे प्रशिक्षण आवश्यक घेतले पाहिजे. आत्मसंरक्षणा बरोबर आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी श्री प्रमोद केळस्कर यांनी केले. Conclusion of Guhagar Judo-Karate training

Conclusion of Guhagar Judo-Karate training

जिल्हा परिषद रत्नागिरीचे महिला व बाल कल्याणविभागाचे वतीने गुहागर हायस्कूल मधील मुलींना एक महिना कालावधीचे जुदो-कराटे चे प्रशिक्षण जुदो प्रशिक्षक निलेश गोयथळे यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समारोप समारंभाला  प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रमोद केळस्कर गटविकास अधिकारी, प.स. गुहागर,  मुख्याध्यापक श्री शिवाजी आडेकर, एकात्मिक महिला व बाल कल्याण विभागाचे सौ महाडिक, सौ हळ्ये, सौ माटल व सौ हळ्ये, वैभव डोणे, पी बी जाधव सर, जुदो प्रशिक्षका सोनाली वरंडे, श्रद्धा चाळके व रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष व प्रमुख प्रशिक्षक निलेश गोयथळे उपस्थित होते. Conclusion of Guhagar Judo-Karate training

गुहागर हायस्कूल मधील एकूण 42 मुलींनी जुदो-कराटे चे प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केले, यावेळी या मुलींनी जुदो-कराटे ची प्रात्यक्षिके करून दाखवली, कु चारूता आठवले, कु दिप्ती घाडी, कु आदर्शा घाडगे यांनी आपली मनोगते व्यक्त करताना अशी प्रशिक्षण आमच्यातील आत्मविश्वास वाढीसाठी खुप महत्वाची ठरतील, असे सांगितले. मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी सर्व विद्यार्थीनींचे कौतुक केले व काळाची गरज म्हणून जुदो-कराटे न शिकता मुलींनी शारिरीक आणि मानसिक विकास वाढविण्यासाठी असे प्रशिक्षण पुढेही नियमीत पणे घ्यावे, असे आवाहन केले. Conclusion of Guhagar Judo-Karate training

Tags: Conclusion of Guhagar Judo-Karate trainingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.