• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दोडवली मासू- वाघांबे-कर्दे रस्त्याची दुरवस्था

by Ganesh Dhanawade
April 4, 2023
in Guhagar
123 2
1
Citizens presented their grievances to the MNS office bearers
243
SHARES
695
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्याजवळ मांडल्या व्यथा

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील दोडवली, मासू, वाघांबे, कर्दे मार्गाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या जवळ व्यथा मांडल्या. कर्दे येथे नुकतीच मनसे पदाधिका-यांजवळ नागरिकांनी बैठक घेतली. Citizens presented their grievances to the MNS office bearers

दोडवली मासू वाघांबे कर्दे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मनसे गुहागरच्या वतीने पं.स.चे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी, उपअभियंता, प्रधानमंत्री ग्राम- सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था चिपळूण कार्यालय यांच्याकडे निवेदने देण्यात आली होती. या प्रमुख मार्गाची दुरावस्था झाली असून या मार्गा वरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अन्यथा मनसे आक्रमक पावित्रा घेईल असा निवेदनाद्वारे इशाराही देण्यात आला होता. तसेच या रस्त्याची पाहणी संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पाहणी केली. तसेच या गावातील नागरिकांच्या भेटीही घेतल्या. Citizens presented their grievances to the MNS office bearers

या रस्त्यासंदर्भात बोलताना नागरिकांनी सांगितले की, या रस्त्यासाठी आम्ही ग्रामस्थ सर्वच लोकप्रतिनिधीच्या दारात गेलो. पंरतु पाहीजे तेवेढा प्रतिसाद कुणीच दिला नाही. थातुरमातुर उत्तरे देवून आमची तोंडे बंद ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. गेली १५ वर्षे ग्रामस्थ या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करत आहेत, परंतु जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. आता या रस्त्याची दुरावस्था झाली असून या खड्डेमय रस्त्यावरून वाहनेही येण्यास तयार होत नाहीत. गावातील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. हॉस्पिटल पर्यत नेताना रुग्ण जीवंत राहील की नाही ही शंका असते. आमदार, खासदार व संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी पत्र व्यवहार, निवेदने देण्यात आली. या पत्रे, निवेदनाला सर्वांनीच केराची टोपली दाखविली, असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. Citizens presented their grievances to the MNS office bearers

या खराब रस्त्यामुळे एस.टी.बंद आहे. शालेय विद्यार्थी, महिला वयोवृध्द नागरिक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. माजी सभापती दत्ता निकम, संतोष रामगडे यांच्या मार्गदर्शानाखाली नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आता मनसेच्या माध्यमातून तरी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांना आहे. यावेळी सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, रमेश कांबळे महाराष्ट्र सैनिक तसेच महीला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. Citizens presented their grievances to the MNS office bearers

Tags: Citizens presented their grievances to the MNS office bearersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.