संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली माहिती
गुहागर, ता. 04 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला दि. ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षा अखेर रूपये ११ कोटी २५ लाख ढोबळ नफा झाला असून नियमानुसार आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तरतुदी केल्यानंतर संस्थेला रुपये ३ कोटी ९९ लाख निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. Profits to Shri Samarth Bhandari Civil Credit Institution

कोकण विभाग कार्यक्षेत्रात संस्थेच्या १७ शाखा व ०२ कलेक्शन सेंटर सुरू असून संस्थेने नियोजनबध्द कामकाज केल्यामुळे तसेच संस्थेचे सभासद व ठेवीदार तसेच कर्जदार यांचे सहकार्यामुळे महत्वाच्या सर्वच बाबीमध्ये चांगल्याप्रकारे प्रगती साध्य केली आहे. दि. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेच्या एकुण ठेवी रु. १५३ कोटी ४१ लाख झाल्या असून मागील वर्षापेक्षा ठेवींमध्ये २७ कोटी ०१ लाखांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा एकुण कर्जव्यवहार रु.१२२ कोटी ९३ लाख असून कर्ज व्यवहारामध्ये २० कोटी ०२ लाख वाढ झाली आहे. दि. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेचे भागभांडवल रु.७ कोटी ९९ लाख निधी ९ कोटी १९ लाख, गुंतवणूका रु.५२ कोटी ३९ लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल रु. १८५ कोटी ४५ लाख झाले आहे. संस्थेने सभासद व ग्राहक यांना सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या असून संस्थेच्या विश्वासार्हतेमुळे संस्थेच्या ठेवी, कर्जव्यवहारामध्ये तसेच इतर सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये सतत चांगल्याप्रकारे वाढ होत आहे. संस्थेने कर्जवितरण करताना सुरक्षित कर्ज व्यवहाराला नेहमीच प्राधान्य दिले असून कर्जदाराचे सहकार्य व वसुलीचे योग्यप्रकारे नियोजन केल्यामुळे संस्थेच्या थकबाकीचे एकुण कर्जाशी प्रमाण केवळ ०.११ टक्के इतके आहे. दि. ३१ मार्च २०२३ अखेर एनपीओ चे प्रमाण शुन्य टक्के आहे. Profits to Shri Samarth Bhandari Civil Credit Institution
या संस्थेमध्ये सीबीएस प्रणाली व्दारे ग्राहकांना सेवा देण्यात येत असून संस्थेच्या सर्व शाखामध्ये ठेवी व कर्जव्यवहाराबरोबरच वीज बील भरणा केंद्र, चेक कलेक्शन, आरटीजीएस/एनईएफटी व्दारे पैसे पाठविणे तसेच स्विकारणे, क्युआर कोड सेवा, सर्व बँकांचे एटीएमव्दारे पैसे काढण्याची सुविधा इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच सभासद, ठेवीदार तसेच हितचिंतक यांचे महत्वाचे योगदान व सहकार्य असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी सांगितले. Profits to Shri Samarth Bhandari Civil Credit Institution
