• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा

by Manoj Bavdhankar
April 4, 2023
in Guhagar
127 2
0
Shri Hanuman Janmatsav at Asgoli
250
SHARES
715
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर ता. 04 : प्रतिवर्षा प्रमाणे श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. 06 एप्रिल 2023 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रेकॉर्ड डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम, श्री सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक, डबलबारी भजनाचा जंगी सामना व नमन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घेऊन कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती मंडळतर्फे करण्यात आली आहे. Shri Hanuman Janmatsav at Asgoli

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळानिमित्त बुधवार दि. 05 रोजी रात्रौ 10 वा. असगोली मर्यादित रेकॉर्ड डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवार दि. 06 रोजी स. 6.20 वा. जन्मकाळ, स. 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, स. 11.30 वा. आरती, दु. 12 ते 2 वा. महाप्रसाद, सायं. 3 वा. पालखी मिरवणूक, रात्रौ 10 वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना (श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ, खुडी-देवगड, बुवा. श्री. संतोष द. जोईल गुरूवर्य श्री. श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य, पकवाज – श्री. शाम तांबे, तबला – श्री. अक्षय मेस्त्री) व (ओम साईलिला प्रासादिक भजन मंडळ, भांडुप – मुंबई, बुवा. श्री. चंद्रकांत जाधव गुरूवर्य श्री. भगवान लोकरे यांचे शिष्य, पकवाज – श्री. रोहन घाडीगावकर, तबला – श्री. साहिल लाड) यांच्यामध्ये होणार आहे.  शनिवार दि. 08 रोजी रात्रौ 10 वा. राजहंस नमन मंडळ वरवेली – रांजाणेवाडी यांचे नमन सादर होणार आहे. Shri Hanuman Janmatsav at Asgoli

तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांनी केले आहे. Shri Hanuman Janmatsav at Asgoli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShri Hanuman Janmatsav at AsgoliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.