विद्यार्थ्यांनी कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे; शैलेंद्र खातू
गुहागर, ता. 04 : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे, असे आवाहन खातू मसालेचे शैलेंद्र खातू यांनी केले. श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय यांच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

खातू पुढे म्हणाले की, या शाळेतून आमचे शिक्षण झाले असून नेहमीच शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील. शिक्षक संजय गमरे म्हणाले की, 1999 साली संस्थेने लावलेल्या विद्यालयाच्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. मुख्याध्यापक समीर गुरव म्हणाले की, वाढत्या झाडाप्रमाणे विद्यार्थी असून वेळीच त्याच्या मधील अनावश्यक फांद्या छाटल्या तर भविष्यात बहारदार वृक्षा प्रमाणे विद्यार्थी ज्ञानाने बहरतो. तसेच व्यासपीठावरील माजी विद्यार्थी अभिजीत मर्दा, कौस्तुभ गद्रे, सुनीत आठवले, आकांक्षा पोतदार, पालक प्रतिनिधी विकास मालप, राधा आरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Prize Ceremony of Annapurna Vidyalaya

यावेळी १ ली ते ४ थी मधील बेस्ट ऑल राऊंड अनुक्रमे सेजल संजय पाटील, साकेत समीर गुरव, नेत्राली निखील ओक, दुर्वा दशरथ नाटेकर व १ ली ते ४ थी मधून एक सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी ईशा केदार परचुरे यांचा तसेच विविध प्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. Prize Ceremony of Annapurna Vidyalaya
