अध्यक्ष पदी सुशील अवेरे तर सचिवपदी अमरनाथ मोहिते यांची निवड
गुहागर, ता.03 : मानवाचे मुलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणारी “ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन” (Human Rights Association for Protection) या संघटनेची गुहागर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्ष पदी ॲड. सुशील अवेरे तर सचिवपदी श्री. अमरनाथ मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली. Human Rights Association Executive Committee Announced

या संघटनेच्या कार्यकारीणीची निवड ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. बाळकृष्ण सोनू वनकर यांनी पत्राद्वारे केली. यामध्ये अध्यक्षपदी वकील व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सुशील गणपत अवेरे, उपाध्यक्षपदी श्री. अरुण महादेव मालप, कार्याध्यक्षपदी गुहागर हायस्कूलचे उप मुख्याध्यापक श्री. सुधाकर शामराव कांबळे, सचिवपदी श्री. अमरनाथ विष्णू मोहिते, कोषाध्यक्ष जामसूद सरपंच श्री. महेश यशवंत जामसुतकर, महिला अध्यक्षपदी सौ. पूजा प्रवीण कारेकर तर महिला सचिव पदी सौ. कामिनी अनुप कोवळे, सल्लागार म्हणून डॉ. बाळासाहेब ढेरे, वकील संकेत अरुण साळवी, सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप भिकू मांडवकर, श्री. शाम हरिचंद्र शिर्के, अपंग पुर्नवसन संस्थेचे अध्यक्ष उदय वसंत रावणग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Human Rights Association Executive Committee Announced

गुहागर तालुक्यामध्ये लवकरच ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर कार्यकारिणीच्या वतीने अनेक कार्यक्रम व जनजागृती मोहीम राबवून अनेक चांगल्या व्यक्तींना या चळवळीमध्ये सहभागी करून समाजोभिमुख कार्य करू, असा विश्वास नूतन अध्यक्ष ॲड. सुशील अवेरे यांनी व्यक्त केला. Human Rights Association Executive Committee Announced
