• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आजपासून राज्यातील नायब तहसीलदार संपावर

by Guhagar News
April 3, 2023
in Maharashtra
82 1
0
Naib Tehsildar on strike from today
161
SHARES
461
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शासकीय यंत्रणा कोलमडणार!

गुहागर, ता. 03 : आजपासून राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसिलदार असे 600 तहसिलदार व 2200 नायब तहसिलदार संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील 358 तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट असण्याची शक्यता आहे. Naib Tehsildar on strike from today

नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे. Naib Tehsildar on strike from today

त्यामुळे गेली 25 वर्षे राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात. मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास, राज्यातील 2200 पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना लाभ होईल आणि सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढेल. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे. Naib Tehsildar on strike from today

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNaib Tehsildar on strike from todayNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.